Viral News: ऐकावं ते नवलंच! कंपनीचं अजब फर्मान; खराब कामगिरी केल्यास कर्मचारी लगावणार एकमेकांच्या कानफटात

हॉककाँगमधील एका कंपनीने कर्मचाऱ्याच्या खराब कामगिरीवर अजब फर्मान काढलं आहे. या कंपनीच्या निर्णयाची जगभर चर्चा सुरू आहे.
Viral News
Viral NewsSaam tv
Published On

New Delhi : अनेक कंपन्यात कर्मचाऱ्यांची कामगिरी चांगली करण्यासाठी अनेक बक्षिस देत असतात. काही दिवसांपूर्वी तर एका कंपनीत ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांचे मनोरंजन करण्यासाठी चीअरलीडर्स ठेवण्यात आले होते. तर एका कंपनीत 'स्लीप डे' या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली होती. याचदरम्यान, हॉककाँगमधील एका कंपनीने कर्मचाऱ्याच्या खराब कामगिरीवर अजब फर्मान काढलं आहे. या कंपनीच्या निर्णयाची जगभर चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)

'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या रिपोर्टनुसार, हे वृत्त इन्शुरन्स फर्ममधील आहे . या वृत्ताबद्दल या फर्ममधील कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. कर्मचाऱ्याच्या पोस्टनंतर हे वृत्त जगासमोर आलं आहे.

Viral News
Licences Cancelled Pharma Company: बनावट औषधं तयार करणाऱ्या 18 फार्मा कंपन्यांचे लायसेन्स रद्द; DCGIची मोठी कारवाई

कर्मचाऱ्याने सांगितले की, 'कंपनीचा वार्षिक कार्यक्रम होता. कर्मचाऱ्यांचं रात्रीचं जेवण सुरू होतं. त्यावेळी विमा कंपनीचे बॉस मंचकावर आले. एका खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला बोलावले. त्याने एका कर्मचाऱ्याला कानफटात वाजवण्यास सांगितले'.

कंपनीचं म्हणणं आहे की, कर्मचाऱ्यांना चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी आम्ही हा प्रयोग करत आहोत. ही सर्व बाब कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

'कंपनीच्या कार्यालयाला टाळा लावा'

विमा कंपनीतील हे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या वृत्तावर नेटकऱ्यांकडून टीका केली जात आहे. या कंपनीच्या कार्यालयाला टाळा लावला पाहिजे, असं एका युजरनने म्हटलं आहे. तर एकाने म्हटले आहे की, या विमा कंपनीचं नाव कळालं तर, या कंपनीची पॉलिसीच बंद करतो. अशी कंपनी कर्मचाऱ्यांसोबत चांगला व्यवहार करू शकत नाही, ती लोकांसोबत कसा व्यवहार करणार, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.

Viral News
Smoking On Bike Viral Video: आली लहर केला कहर! चालू गाडीवर चिमुकल्यासमोर बायकोचा असा प्रताप, नेटकरी म्हणाले; 'अटक करा...'

अनेक कर्मचाऱ्यांनी दिले राजीनामे

विमा कंपनीच्या या निर्णयानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. कर्मचाऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तर अनेक जण घटनेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com