Viral Video News: वाहन चालवताना नेहमी काळजी घेणे गरजेचे असते. चालकाची एक चूक किती महागात पडू शकते याची अनेक उदाहरणे आपण पाहत असतो. मात्र असे असले तरी वाहन चालकांचा हलगर्जीपणा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, ज्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या एका जोडप्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू... (Couple Riding On Bike Viral Video)
आपल्या देशात रस्ते सुरक्षा किंवा वाहन चालवताना पाळावे लागणारे नियम याबाबत कितीही जनजागृती केली तरी सुधारणा होणे अशक्यचं. गाडी चालवताना वेगवेगळे स्टंट करण्याचे, वेगाने गाड्या पळवण्याचे असंख्य प्रकार घडत असतात. अशा चुकांमुळे विनाकारण अपघाताला (Road Accident) आमंत्रण दिले जाते. सध्या असाच एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघांचाही प्रताप पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये पती पत्नी दुचाकीवरुन प्रवास करताना दिसत आहेत. पहिली चूक म्हणजे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने डोक्याला हेल्मेटचं घातलेले दिसत नाही. आणि दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे ही व्यक्ती चालू गाडीवर सिगारेट ओढताना दिसत आहे. ज्यासाठी त्याला पाठीमागे बसलेली बायकोच मदत करताना दिसत आहे.
गाडी चालवणाऱ्या तरुणाला सिगारेटची झालेली तलफ त्याची पत्नी पुर्ण करत आहे. पाठीमागे बसून ती सिगारेटचे झुरके त्याला देत आहे तर तो तरुण गाडीवर दुर्लक्ष करुन पाठीमागे वळून आरामात सिगारेट ओढताना दिसत आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे त्यांच्या गाडीवर समोर त्यांचा चिमुकला मुलगा बसलेला असताना हा सर्व प्रकार सुरू आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांनी या दोघांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी जीव इतका स्वस्त आहे का रे बाबा म्हणत त्या तरुणाला खडेबोल सुणावले आहेत. तसेच त्या चिमुकल्यासमोर असे प्रकार करुन स्वतःसह संपूर्ण कुटूंबाचा जीव धोक्यात न घालण्याचा सल्लाही अनेकांनी दिला आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्यांना अटक करण्याचीही मागणी केली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.