Girish Bapat Health : गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट

Pune Girish Bapat News : पुण्याचे खासदार गिरीष बापट यांची प्रकृती चिंताजनक
Pune Girish Bapat News
Pune Girish Bapat NewsSaam Tv

Girish Bapat Health Update : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कसबा पेठ निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता. त्यावेळी ते आजारी असताना देखील त्यांना भाजपने प्रचारात का उतरवलं म्हणून सर्व स्थरातून जोरदार टीकाही झाली होती. (Latest Marathi News)

Pune Girish Bapat News
Vasai Crime News : चोर सोडून सन्याशाला फाशी! पोलिसांच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

आता खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या संदर्भात दिनानाथ रुग्णालयाकडून खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यात डॉक्टर म्हणाले की, खासदार बापट यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. बापट हे सध्या icu मध्ये आहेत. त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. यासंदर्भात अधिक माहिती दुपारी २ वाजेनंतर देण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

Pune Girish Bapat News
Nashik Accident News: दुर्देवी! कांदा विक्रीसाठी जाताना अपघात; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

आपल्या तब्बल चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आजही पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा दबदबा कायम आहे. यामुळेच नुकत्याच झालेल्या पुणे कसबा पेठ पोटनिवडणुकीत त्यांना व्हिलचेअरवर बसवून प्रचाराच्या मैदानात उतरले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com