Licences Cancelled Pharma Company: बनावट औषधं तयार करणाऱ्या 18 फार्मा कंपन्यांचे लायसेन्स रद्द; DCGIची मोठी कारवाई

DCGI News : बनावट औषधांची निर्मिती करणाऱ्या बोगस फार्मा कंपन्यांवर डीसीजीआयने कारवाईचा बडगा उगारला आहे.
Licences Cancelled Pharma Company
Licences Cancelled Pharma CompanySAAM TV
Published On

Licences Cancelled Pharma Company: काही महिन्यांपासून बनावट कफ सिरफसंदर्भात बऱ्याच तक्रारी डीसीजीआयला प्राप्त झाल्या होत्या. गांबियामध्ये ६६ मुलांच्या मृत्यूलाही हेच कफ सिरफ कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. सीडीसीच्या रिपोर्टमध्ये यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कारवाईसंदर्भात दबाव आणखी वाढला होता. त्यानंतर औषध महानियंत्रकाच्या (DCGI) रडारवर अनेक औषध कंपन्या आल्या होत्या.

बाजारात बनावट औषधे विकली जात असल्याची माहिती मिळाली होती. अखेर अशा बनावट औषधं तयार करणाऱ्या फार्मा कंपन्यांवर डीसीजीआयनं मोठी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

Licences Cancelled Pharma Company
Ghaziabad Crime News : प्रियकराने विवाहित प्रेयसीला आधी भेटायला बोलावलं आन् नंतर जे घडलं ते भयंकर होतं…

बनावट औषधांची निर्मिती करणाऱ्या बोगस फार्मा कंपन्यांवर डीसीजीआयने कारवाईचा बडगा उगारला आहे. २० राज्यांतील ७६ कंपन्या डीसीजीआयच्या रडारवर होत्या. त्यानंतर चौकशी करण्यात आली. डीसीजीआयने अशा १६ बोगस कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत.

बोगस कंपन्यांचा (Fake Companies) भंडाफोड केल्यानं या क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. आता देशभरात अशा प्रकारे आणखी मोठ्या कारवाया केल्या जाणार आहेत. डीसीजीआयने हिमाचल प्रदेशातील ७०, उत्तराखंडमधील ४५ आणि मध्य प्रदेशातील २३ कंपन्यांवर कारवाई केली आहे.

मात्र, डीसीजीआयने नियमानुसार कारवाई केली नाही, असा आरोप या कंपन्यांनी केला आहे. केवळ तक्रारी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे.

Licences Cancelled Pharma Company
Uttar Pradesh Crime News: बदनामीच्या भितीने भयंकर घडलं! आधी शिक्षक लेकीची गोळ्या झाडून हत्या अन् स्वतःही संपवले आयुष्य

नोएडातही कारवाई

एका महिन्यापूर्वी डीसीजीआयने नोएडामध्येही मोठी कारवाई केली होती. नोएडातील एका कंपनीच्या तीन वरिष्ठ कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती. तर काही कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. एका कंपनीला तर उजबेकिस्तानमध्ये मुलांच्या मृत्यू प्रकरणातही आरोपी मानले गेले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com