Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Karmayogi Abasaheb Movie: राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध "कर्मयोगी आबासाहेब" चित्रपट
Karmayogi Abasaheb Movie
Karmayogi Abasaheb MovieSaam Tv
Published On

राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध "कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला असून, २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Karmayogi Abasaheb Movie
'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव,अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे. आता प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. मात्र, समाजाचा उद्धार, उन्नती करण्यासाठी मा. गणपतराव देशमुख यांच्यासारखे नेते विरळच... त्यामुळेच "कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटातून मा. गणपतराव देशमुख यांच्या हळव्या, कर्तव्यकठोर, कृतीशील, विचारी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला आहे. अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येताना त्यांनी केलेला संघर्ष, त्यातलं राजकारण उलगडतानाच त्यांनी केलेला विकास, सुधारणा, शेतकरी, वंचित घटकांसाठीचं काम दाखवण्यात आलं आहे. त्यामुळेच जनतेनं आबासाहेबांवर अलोट प्रेम केलं. या सर्वांचं दर्शन "कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटातून घडणार आहे.

Karmayogi Abasaheb Movie
Remo D'Souza: १२ कोटींची फसवणूक, रेमो डिसूझा आणि पत्नीसह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com