Uttar Pradesh Crime News Saam TV
देश विदेश

Uttar Pradesh Crime News: 'घरी मी एकटाच आहे, तू ये...'; नकार मिळताच पोलीस आणि तरुणीमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

Uttar Pradesh Crime : नकार दिल्यावर चॅट व्हायरल झाल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ पसरली आहे.

Ruchika Jadhav

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमध्ये सातत्याने गुन्हेगारीच्या विचित्र घटना समोर येत आहेत. यामध्ये आता पोलिसांपासून देखील जनता सुरक्षित राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित करणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पोलिस उपनिरीक्षकाची आणि मुलीची व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाली आहे. या चॅटमध्ये अक्षेपार्ह मॅसेज असल्याचं दिसत आहे. (Latest Uttar Pradesh Crime News)

चॅटचा फोटो पोलीस उपनिरीक्षक आणी एका मुलीमधील आहे. यामुळे नेटकऱ्यांनी या फोटोवर विचित्र कमेंट केल्यात तसेच आरोपीवर कडक कारवाई करा अशी मागणी केली आहे. सदर चॅटमध्ये पोलीस उपनिरीक्षक मुलीने तक्रार केल्यावर तिला घरी बोलावत आहे. रात्री तीन वाजता मुलीला घरी बोलावलंय. मुलीला या गोष्टी ठिक वाटत नाही असं तिने म्हटल्याचं चॅटमध्ये दिसत आहे. नकार दिल्यावर चॅट व्हायरल झाल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ पसरली आहे.

व्हायरल फोटोत नेमकं काय म्हटलंय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असेला फोटो व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा (WhatsApp Chat) आहे. त्यात दिसत आहे की, मुलीने आपल्या मामाला कोणीतरी घेऊन गेल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसाला मामाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला आहे. त्यानंतर पोलिसाने तिला रात्री ३ वाजता मॅसेज केला. घरी "मी एकटाच आहे, तू घरी ये!” पोलिसाच्या या मॅसेजवर मुलगी म्हणते की, खुप उशिर झाला आहे आणि घरी सगळे झोपलेत. आता मी कशी येणार? मला हे बरोबर वाटत नाही? मुलीच्या या मॅसेजला रिप्लाय करत पोलीस पुन्हा म्हणतो की, "मी तुला थोडीच खाणार आहे." पोलिसांचा घरी बोलावण्याचा हेतू चांगला नसल्याचं या मुलीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, हा व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यावर कानपूर पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेत आरोपी पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे. चॅट व्हायरल झाल्यावर सुरुवातीला प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नंतर हे प्रकरण पोलीस आयुक्तांपर्यंत पोहचले. त्यामुळे सदर प्रकरण बाहेर आलं आहे. आरोपी पोलिसाने या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांना देखील फोनवर धमक्या दिल्या आहेत.

मुलीने नेमकी काय मदद मागितली होती?

रतनलाल नगर परिसरात काही दिवसांपू्र्वी एका व्यक्तीवर ५ ते ६ जणांकडून हल्ला करण्यात आला. त्या व्यक्तीवर हल्ला करत त्याला उचलून नेण्यात आले. सदर व्यक्ती तक्रारदार मुलीचा मामा होता. आपल्या मामाला कोणीतरीस घेऊन गेलं आहे त्यांना शोधा असं म्हणत मुलीने मामाचा फोटो पोलिसांना पाठवला होता. मात्र पोलिसांनी यावर अक्षेपार्ह रिप्लाय केलाय. सदर प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT