Hindu Samaj Leader Shot Dead saam
देश विदेश

नेत्याची भररस्त्यावर गोळ्या झाडून हत्या, कुटुंबाला वेगळाच संशय, हत्येमागे भाजपचा हात असल्याचा आरोप

Hindu Samaj Leader Shot Dead: हिंदू समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमल चौहान यांची मुरादाबाद येथे गोळ्या झाडून हत्या. हल्लेखोर दुचाकीवर येऊन चौहान यांच्यावर भररस्त्यावर गोळीबार करून पसार.

Bhagyashree Kamble

  • हिंदू समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमल चौहान यांची मुरादाबाद येथे गोळ्या झाडून हत्या.

  • हल्लेखोर दुचाकीवर येऊन चौहान यांच्यावर भररस्त्यावर गोळीबार करून पसार.

  • कुटुंबाने भाजपाशी संबंधित लोकांवर हत्येचा आरोप केला.

  • मुख्य आरोपी सनी सोनू दिवाकरच्या शोधासाठी तीन पोलीस पथके तयार.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद कटघर पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हिंदू समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमल चौहान यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांचा खून केला आहे. कमल चौहान आपल्या घरी परतत असताना करूला परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर चौहानच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, त्यांनी हत्येबाबत वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी कमल चौहान हे त्यांच्या स्कूटरवरून संजय नगर येथील घरी परतत होते. त्यानंतर काही हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यांनी चौहान यांच्यावर हल्ला केला. तसेच भररस्त्यावर गोळ्या झाडल्या. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्लेखोरांनी कमल चौहान यांच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडल्या.

त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केलं. जखमी कमल चौहान यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. एसपी सिटी कुमार रणविजय सिंह म्हणाले की, 'कटघर पोलीस स्टेशन परिसरातील करूलाजवळ स्कूटीवरून कमल चौहान जात होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले'.

' मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कुटुंबांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहे. लवकरत मारेकरी पकडले जातील', असं पोलीस म्हणाले.

कमल चौहानच्या कुटुंबाने भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोकांवर हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाच्या संबंधित मुख्य आरोपी सनी उर्फ सोनू दिवाकरचा शोध सुरू आहे. यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील हॉटेलला आग

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २० हजार कोटींची मदत जमा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती|VIDEO

Real cause of breast pain: स्तनात जाणवणाऱ्या वेदनांचं खरं कारण काय? डॉक्टरांनी सांगितला महिलांसाठी महत्त्वाचा इशारा

Shocking News : डोंबिवलीत हत्येचा थरार! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या, पोलिसांनी काही तासात आवळल्या हल्लेखोरांच्या मुसक्या

Pawna Lake Tourism: बजेट कमी आहे? 'या' ठिकाणी करा ट्रीप, कुल्लू मनाली विसराल

SCROLL FOR NEXT