Uttar Pradesh Crime  Saam Tv Marathi
देश विदेश

Shocking: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, मध्यरात्री झोपेत असताना जागीच संपवलं

BJP leader shot dead: उत्तर प्रदेशमध्ये भाजप नेत्याची गळ्या झाडून हत्या करण्यात आली. मध्यरात्री हे हत्याकांड घडलं. झोपेत असतानाच डोक्यात गोळ्या झाडल्या. सकाळी ही घटना उघडकीस आली.

Priya More

Summary -

  • उत्तर प्रदेशात भाजप नेत्याची हत्या

  • झोपेत असताना गोळ्या झाडून केली हत्या

  • हत्या झालेल्या नेत्याचे नाव धर्मसिंह कोरी

  • मध्यरात्री ही घटना घडली पण कुटुंबीयांना सकाळी कळाले

उत्तर प्रदेशमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपाचे अंबेहटा मंडळाच्या उपाध्यक्षाची हत्या करण्यात आली. मध्यरात्री हत्याकांडाची ही घटना घडली. टीडौली गावामध्ये राहणारे आणि भाजपचे अनुसूचित मोर्चाचे मंडळ अध्यक्ष सुनील कोरी यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली. धर्मसिंह कौरी(६५ वर्षे) असं हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

सुशील कोरी यांनी सांगितले की, सकाळी माझी बायको सुनीताने पाहिले की माझे वडील झोपलेल्या खाटेजवळून रक्त वाहत होते. ते पाहून ती प्रचंड घाबरली आणि ती जोरजोरात ओरडू लागली. त्यानंतर सर्वांनी घटनास्थळी धाव घेत. सर्वांना मोठा धक्का बसला. माझ्या वडिलांची डोक्यामध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. माझे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. वडिलांची अवस्था पाहून आम्ही प्रचंड घाबरलो.

घटनेची माहिती कळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. हत्या झालेल्या भाजप नेत्याच्या मुलाने सांगितले की, मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास कुत्री भूंकत होती. त्याचवेळी फटाके फुटल्यासारखा मोठा आवाज आला. आम्हाला वाटले गावामध्ये दोन लग्न आहेत तिथे फटाके फोडत असावेत. फटाक्यांच्या आवाज समजून आम्ही सर्वजण झोपून गेलो.पण सकाळी उठल्यानंतर कळाले की वडिलांची हत्या झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Family Photos: अजित पवारांचे अविस्मरणीय क्षणांचे काही फोटो! पाहून डोळ्यात येईल पाणी...

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात मुक्काम करणार

Ajit Pawar Death: अजित पवारांबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

Mumbai Railway : मुंबई रेल्वेचा मोठा निर्णय! प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 'तिसरा डोळा'; नेमकं प्रकरण काय?

Toe Rings Design: नव्या नवरीसाठी जोडव्यांच्या सुंदर आणि नाजूक 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT