girl news  Saam Tv
देश विदेश

तरुणीवर वाकडी नजर; मंदिरात एकट्यात गाठलं; नराधमाकडून हातपाय बांधून अत्याचार

uttar pradesh shocking : मंदिरात आलेल्या तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Saam TV News

उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मंदिरात दिवा पेटवण्यास आलेल्या तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. मंदिरात तरुणीवर अत्याचार केल्यानंतर नराधमाने घटनास्थळावरून पळ काढला. तरुणीवरील अत्याचाराने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मंदिरात लपून बसला होता. आरोपी तरुणी मंदिरात येण्याची वाट पाहत होता. तरुणी मंदिरात येताच त्याने तिला बांधलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी राजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

तरुणी संध्याकाळ झाल्याने मंदिरात दिवा लावायला आली होती. मंदिरात दिवा लावत असताना नराधम तिची वाट पाहत लपला होता. त्याने मंदिरात आलेल्या तरुणीचा पकडलं. त्यानंतर तोंडात कापडाचा गोळा टाकला. त्यानंतर हात-पाय बांधून तिच्यावर अत्याचार केला.

मुलगी घरात वेळ घरी परतली नसल्याने कुटुंबीय शोधण्यासाठी मंदिरात गेले. त्यावेळी कुटुंबीयांना मंदिराच्या मागून आवाज येत असल्याचे ऐकू आले. त्यानंतर कुटुंबीय घटनास्थळी गेले. त्यावेळी नराधम हा तरुणीवर अत्याचार करत होता. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ धावत पळत मंदिर परिसरात पोहोचले. मोठ्या संख्येने लोक जमल्याने नराधम त्याचा मोबाईल आणि कपडे सोडून पळाला.

गावात संतापाची लाट

पीडित तरुणीवर अत्याचार झाल्याची माहिती गावभर पसरल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. त्यानंतर लोकांनी आरोपीची दुचाकी पेटवून दिले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने गावात पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तरुणीवर मंदिरात अत्याचार झाल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंजवडीत रस्त्यांवरील खड्ड्यांची पूजा आणि आरती करत अनोखे आंदोलन

Manisha Koirala: 'मला वाटलं मी मरणार...'; स्टेज ४ कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

Rahul Gandhi: राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, वीर सावरकर प्रकरणाचा खटला रद्द

Supriya Sule: काल, आज आणि उद्या शिवसेना उद्धव ठाकरेंचीच अन् राष्ट्रवादी शरद पवारांचीच, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Gen Alpha Club : "....काका तुम्ही कॉपी करून पास झालात का?" साम टीव्हीच्या नेक्स्ट Gen रिपोर्टरचा रस्ते बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला सवाल

SCROLL FOR NEXT