Uttar Pradesh bus accident  Saam TV Marathi News
देश विदेश

Accident : मध्यरात्री ट्रकला जोरदार धडक, बसने घेतला पेट, ३ जणांचा होरपळून जागीच मृत्यू, २५ गंभीर जखमी

Uttar Pradesh bus accident Bihar Delhi route details : उत्तर प्रदेशातील फुलवारिया बायपासजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. धडक झाल्यानंतर बस उलटली आणि पेट घेतला. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी झाले.

Namdeo Kumbhar

Uttar Pradesh bus accident : उत्तर प्रदेशमध्ये मंगळवारी पहाटे ट्रक आणि बस यांचा भीषण अपघात झालाय. ट्रकला जोरात धडक झाल्यानंतर बस पलटली अन् पेट घेतला. या दुर्दैवी घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलेय. ५ जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या सर्व जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी बहराइच येथील सरकारी रूग्णालयात हलवण्यात आलेय. त्यामुळे मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधील पुलवरिया बायपासजवळ हा अपघात झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळावर पोहचले. बिहारमधील सौनौलीमधून राजधानी दिल्लीकडे बस निघाली होती. त्यावेळी ट्रकला जोरात धडकली अन् पलटली. त्यानंतर बसने पेट घेतला. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. तर ५ जण अतिशय गंभीर जखमी आहेत. २५ जखमींवर सध्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. आग लागल्यामुळे मृतदेह जळून राख झाले आहेत. त्यामुळे अद्याप त्यांची ओळख पटवता आलेली नाही. जखमींपैकी अनेकजण हे नेपाळमधील असल्याचे समोर आलेय.

बिहारच्या सोनौलीहून दिल्लीला जाणारी बस पहाटे २:१५ वाजता उत्तर प्रदेशमध्ये फुलवारिया चौकात एका ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बसचे नियंत्रण सुटले अन् ती उलटली त्यानंतर आग लागली. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसने पेट घेतल्याने भीतीचे वातावरण पसरले. आरडाओरडा ऐकून जवळील रहिवासी आणि इतर वाहनांमधून जाणाऱ्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरू केले. अनेक प्रवाशांनी काचा फोडल्या आणि बसमधून बाहेर पडून इतरांना वाचवण्याचे काम केले. पोलिसांना आणि अग्निशमन दलालाही तात्काळ याबाबत माहिती दिली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बस आणि ट्रकमधील आग विझवली. लोकांना बाहेर काढेपर्यंत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. नंतर एका व्यक्तीचा मृतदेह बसखाली आढळून आला. जखमींना प्राथमिक उपचारांसाठी बलरामपूर येथील संयुक्त जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : कोल्हापूर जिल्ह्यात पहिला दोन तासात 12 टक्के मतदानाची नोंद

Sachin Pilgaonkar Video : "मी 9 वर्षांचा होतो तेव्हा पहिली गाडी घेतली..."; महागुरु सचिन पिळगावकरांचा आणखी एक दावा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

मतदानाच्या दिवशी बदलापुरात राडा! भाजप- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये WWF, VIDEO व्हायरल

Accident : सहलीवरून येणाऱ्या ५५ विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात, डिव्हायडरला धडकून गाडी उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळली अन्...

Maharashtra Live News Update: कुवेत- हैदराबाद इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी

SCROLL FOR NEXT