UTTAR PRADESH BALRAMPUR CAR ACCIDENT AI Image
देश विदेश

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Accident News : उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये भरधाव कार ग्रामस्थांच्या अंगावर घुसल्याने तिघांचा मृत्यू, तर चौघे जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक असून पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील चरनगहिया-बेलहा गावात भीषण अपघात

  • दुर्गा मंदिरासमोर घडली दुर्घटना

  • रस्त्याच्या कडेला बसून व्हिडिओ पाहणाऱ्या रहिवाशांना भरधाव कारची धडक

उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात भरधाव कारने ग्रामस्थांना चिरडल्याची भीषण घटना घडली आहे. चरनगहिया-बेलहा गावात शनिवारी रात्री दुर्गा मंदिरासमोर रस्त्याच्या कडेला बसून व्हिडिओ पाहणाऱ्या ग्रामस्थांच्या अंगावर अनियंत्रित कार घुसली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी बहराइच येथे हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास चरनगहिया-बेलहा गावातील दुर्गा मंदिरात आरती पार पडली होती. त्यानंतर काही रहिवाशी रस्त्याच्या कडेला पडदा लावून व्हिडिओ पाहत होते. याचवेळी गौरा चौराह्याच्या दिशेने जाणारी भरधाव कार अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. कारने तंबूचा काही भाग तोडत रहिवाशांना धडक दिली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मदतीसाठी ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.

या अपघातात पाटेश्वरी प्रसाद उर्फ महता प्रसाद (वय ४२), मनोज सिंह (वय ५१) आणि गणेश पांडेय (वय ४५) यांचा मृत्यू झाला. तर छेदीराम (वय ५०), घोपराम (वय ३१), डब्लू (वय ३७) आणि मुकेश तिवारी (वय ३०) हे चौघे जखमी झाले आहेत. सर्वजण याच गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी जखमींना जिल्हा मेमोरियल रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी दोघांना प्रकृती गंभीर असल्याने बहराइच येथे पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणी क्षेत्राधिकारी अभिषेक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाने मद्यप्राशन केले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत असून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्रलंबित, शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 कधी येणार?

SCROLL FOR NEXT