Marriage Turns Tragedy: Elderly Groom Dies After Wedding Night in Jaunpur Google
देश विदेश

७५ व्या वर्षी ३५ वर्षाच्या मुलीसोबत विवाह, लग्नाची पहिली रात्र उलटताच वृद्धाचा मृ्त्यू, नेमकं काय घडलं?

Uttar Pradesh groom death : उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये ७५ वर्षीय वृद्धाने ३५ वर्षीय महिलेशी लग्न केले. परंतु लग्नाच्या पहिल्याच रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. संशयास्पद मृत्यूमुळे गावात खळबळ माजली असून पोलिस तपास करत आहेत.

Namdeo Kumbhar

75 year old man marries 35 year old woman in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमधून एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. ७५ वर्षीय वृद्धाने ३५ वर्षीय महिलेसोबत संसार थाटला. पण लग्नाच्या पहिली रात्र त्याची शेवटची ठरली. मधुचंद्राच्या रात्रीनंतर सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेने जौनपूरमधील गौराबादशाहपूर गावात खळबळ उडाली आहे. मृत ७५ वर्षीय वृद्धाचे नाव संगरू राम असे आहे. पत्नीच्या निधनानंतर त्यांनी ३५ वर्षाच्या मनभावती यांच्यासोबत संसार पु्न्हा थाटला होता. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गौराबादशाहपूर या गावात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली असून लोक ना ना ऱ्हाचे अंदाज वर्तवत आहेत.

( elderly man dies after marrying young woman UP viral new )

७५ वर्षीय संगरू राम यांच्या पत्नीचे निधन वर्षभरापूर्वी झाले होते. त्यांना अपत्य नाही. ते एकटेच राहत होते. उर्वरित आयुष्य घालवण्यासाठी त्यांनी जोडीदार निवडला अन् संसार थाटला. संगरू राम यांनी ३५ वर्षाच्या मनभावती यांच्यासोबत आधी कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर मंदिरात परंपरेप्रमाणे विवाह केला. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

उतारवयात लग्न करुन संगरू राम यांनी स्वप्ने रंगवली होती. पण पहिल्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगरू राम गेल्या काही दिवसांपासून दुसरं लग्न करण्याचा विचर करत होते. गावातील अनेकांना त्यांना वय झालेय, आता कुठे लग्न करता.. म्हणत समजावलं. पण त्यांनी कुणाचेही ऐकलं नाही. सोमवारी संगरू राम यांनी जलालपूरमधील ३५ वर्षाच्या मनभावती यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर एका मंदिरात रिती रिवाजाप्रमाणे विवाह केला. मनभावती यांचेही हे दुसरे लग्न होते. पहिल्या नवऱ्यापासून तिला दोन मुली अन् एक मुलगा आहे.

मनभावतीने सांगितले की, संगरू राम यांनी मला सांगितलेलं की, तू घर संभाळ.. मुलांची जबाबदारी मी उचलतो. लग्नानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत होते. सकाळी त्यांची अचानक तब्येत बिघडली म्हणून रूग्णालयात दाखल केले, त्यावेळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. संगरू राम याच्या भाच्याने संशय व्यक्त करत अंत्यसंस्कार थांबवला होता. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात येत आहे. पोस्टमार्टमही केला जाणार आहे. त्यानंतरच सत्य समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hruta Durgule Husband: अभिनेत्री हृता दुर्गुळेचा नवरा कोण?

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गूढ वाढलं, पोलिसांनंतर आता खासदारासह पीएवर गंभीर आरोप; भावाचा खुलासा

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आशा वर्करवर ॲम्बुलन्स चालकाकडून लैंगिक छळ

Nashik Crime : संतापजनक; रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत गैरवर्तन, रात्री परतताना चालकाचे कृत्य

"RSS रजिस्टर आहे का?" सुजात आंबेडकरांचा थेट सवाल|VIDEO

SCROLL FOR NEXT