Uttar Pradesh Wedding Tragedy Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh: दुःखद घटना ! विहीरीत पडून 13 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथे काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील गोरखपूर (Gorakhpur) येथे काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये एक नाही तर तब्बल १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विहीरीवर (Well) असलेला स्लॅब कोसळल्यामुळे (slab collapsed) ही घटना घडल्याचे समजत आहे. (Uttar Pradesh Wedding Tragedy: 13 Women die after falling into well)

हे देखील पहा-

कुशीनगर येथे काल रात्री ८:३० वाजेच्या सुमारास लग्नाच्या (marriage) कार्यक्रमात घडलेल्या या घटनेमध्ये १३ जणांचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती. स्थानिकांच्या मदतीने रात्री मदतकार्य (Help) सुरु होते. गोरखपूर जिल्ह्यामधील (district) नेबुआ नौरंगिया परिसरात नौरंगिया स्कूल टोला येथील एका घरात लग्न समारंभ होता.

यावेळी गावामधील (village) महिला आणि मुली लग्न असलेल्या घराजवळ असलेल्या विहिरीवर उभे होते. हळदीचा विधी सुरु केला जाणार होता. त्याचवेळेस महिला आणि मुली उभ्या असल्याने विहिरीवर लोखंडी जाळी अचानक तुटल्यामुळे महिला आणि मुली विहिरीत पडले आहेत. या घटनेमध्ये काही जण जखमी असून, मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी देखील या घटनेनंतर आपल्या भावना व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे, असे स्थानिक प्रशासनाकडून (administration) सांगण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Saraf Age: अशोक सराफ यांचे खरं वय किती?

Nitanshi Goel: 'लापता लेडीज'मधील 'फूल'चा ऑफ-शोल्डर गाऊन लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Mumbai Monorail : मुंबईत मोनो रेल अडीच तासांपासून विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल|VIDEO

Pandharpur Crime : पंढरपूर हादरले; पत्नीला कलाकेंद्रात नाचायला पाठवलं, दिराने केली भावजयीची हत्या

SCROLL FOR NEXT