सुशांत सावंत
मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तसेच किरीट सोमय्या यांच्याबरोबरच भाजपच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन राऊत यांचा जोरदार समाचार घेतला. या पत्रकारपरिषदेतून राणेंनी संजय राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप यावेळी केले आहेत. यावेळी सामना वृत्तपत्रातून २०१९ पूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या टीकात्मक वृत्तांचे दाखले देत राऊत हे पैशांसाठी काहीही लिहू शकतात असा आरोपही नारायण राणेंनी यावेळी केला आहे. संजय राऊत हे शिवसेना संपण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे, अशी खोचक टीका त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. (Sanjay Raut took betel nut NCP end Shiv Sena)
हे देखील पहा-
"संजय राऊत हा व्यक्ती नेत्यानेत्यांमध्ये आणखी कशी आग लावता येईल, भांडण लावता येईल हेच पाहत असतो" असे बाळासाहेब ठाकरे संजय राऊत यांच्याबाबत म्हणाले होते असा दाखला देत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जोरदार हल्ला चढवला. संजय राऊत शिवसेनेमध्ये सामनाचे संपादक म्हणून आले. पत्रकाराला शोभेल अशी संजय राऊत यांची भाषा नाही. लोकप्रभा वृत्तपत्रातून हकालपट्टी झाल्यावर ते सामनामध्ये आल्याचा घणाघात राणेंनी राऊतांवर केला. संजय राऊत पगारी नेता असून सामनामध्ये ओव्हरटाईम करून पैसे कमवायला आल्याची जहरी टीका देखील राणेंनी राऊतांवर केला. शिवसेनेच्या जन्मानंतर २६ वर्षांनी राऊत शिवसेनेत आले त्यामुळे बाळासाहेबांना त्यांचा आशीर्वाद कसा? हा सवालही राणेंनी उपस्थित केला.
पुढे राणे म्हणले एवढे दिवस सेना भवन आठवले नाही. काय भगवी शाल घालून आले, जसे काय शिवसेना प्रमुख हेच आहेत. नारायण राणेंनी पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांचा पक्षातील इतिहास सांगितले. 10 मे 1092 ला संजय राऊत सामनात संपादक म्हणून आले. लोकप्रभात असताना त्यांनी पराक्रम केले. त्यांनी त्यावेळी बाळासाहेब यांच्या विरोधात अनेक मूलाखती लिहिल्या. माझ्याकडे लोकप्रभाचे सर्व अंक आहेत. साहेबांनी हा पत्रकार कसा आहे हे सांगितले मी आज इथे बोलू शकत नाही. हा पत्रकार कशी अंतर्गत आग लावता येईल असे साहेबांनी राऊतांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले असल्याचे नारायण राणे म्हणाले. संजय राऊतांना बाळासाहेब लाचार पत्रकार म्हणाले होते असे नारायण राणे म्हणले.दरम्यान, शिवसेनेची स्थापना करतेवेळी आम्ही होतो. तेव्हा संजय राऊत कुठेच नव्हते. आम्ही वर्गणी गोळा करून पक्ष उभा केला, शिवसेना भवन बांधले असल्याचेही राणे म्हणाले.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.