mmmut student Saam tv
देश विदेश

Success story : दोन वेळ खाण्याची भ्रांत, वडिलांना महिना १२ हजार पगार; लेकीला मिळाली ४५ लाखांच्या नोकरीची ऑफर

mmmut student News : दोन वेळ खाण्याची भ्रांत असताना लेकीने अभूतपूर्व यश मिळवलं आहे. वडिलांना महिना १२ हजार रुपये पगार असताना लेकीला ४५ लाखांच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये मदन मालवीय विद्यापीठ म्हणजे MMUT च्या बीटेक कॉम्प्यूटर सायन्सच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 'अॅमेझॉन' कंपनीत ४५ लाखांच्या वार्षिक पॅकेजची ऑफर मिळाली आहे. विद्यार्थिनीला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर म्हणून नोकरी ऑफर करण्यात आली आहे. ४५ लाखांच्या पॅकेजमुळे विद्यार्थिनीचं नशीब उजळलं आहे. शताक्षी निगम असे विद्यार्थिनीचे नाव आहे.

एमएमयूटीची ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे चेअरमॅन प्रो. वीके द्विवेदी यांनी सांगितलं की, 'शताक्षी निगमने 'अॅमेझॉन' कंपनीसाठी ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीत चांगली कामगिरी केली. दुसऱ्या राऊंडच्या कोडिंगमध्ये यश मिळवलं. त्यानंतर तिला 'अॅमेझॉन'ने १.१० लाख रुपयांची महिना इंटर्नशिप सुरु केली होती. इंटर्नशिपदरम्यान चांगलं कौशल्य दाखवल्याने तिला ४५ लाखांच्या पॅकेजची नोकरी ऑफर करण्यात आली आहे.

शताक्षीने आर्थिक अडचणींवर मात करून यश संपादन केलं आहे. तिचे वडील अश्विनी निगम हे एका खासगी कंपनीत सेल्समेनचे नोकरी करतात. त्यांना महिना १२ हजार रुपये पगार आहे. शताक्षीच्या आईचं नाव नीलम निगम आहे. त्या गृहिणी आहेत. शताक्षीचे कुटुंबीय भाड्याच्या घरात राहतात. शताक्षीने सांगितलं की, माझ्या आई-वडिलांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे. त्यांच्यासाठी माझ्या शिक्षणाचा खर्च उचलणेही अवघड होतं. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी कर्ज काढलं. मी माझ्या कुटुंबावरील कर्ज इंटर्नशिपमधून मिळालेल्या स्टायपेंडमधून फेडलं.

विद्यापीठाचं नाव उंचावलं

शताक्षीने उत्तर प्रदेशच्या बोर्डाच्या परीक्षेच चांगले गुण मिळवले होते. तिने कानपूर नगरात १५ वा क्रमांक पटकावला होता. शताक्षीने तिच्या यशाचं श्रेय विद्यापिठीचे कुलपती प्रो. जेपी सैनी, प्रो. वीके द्विवेदी, प्रो. उदय शंकर यांना दिलं आहे. एमएमयूटीचे कुलपती प्रो. जेपी सैनी यांनी शताक्षीचं अभिनंदन करत विद्यापीठासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

SCROLL FOR NEXT