Us Plane Crash: Six Dead In Wisconsin Piper Pa-46 Accident 
देश विदेश

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

US Plane Crash : अमेरिकेतील विस्कॉन्सिन डेल्सजवळ विमान कोसळलं असून सहा जणांचा मृत्यू झाला. विस्कॉन्सिन डेल्सजवळील डेलोना परिसरात मिरर लेक स्टेट पार्कजवळ दाट झाडीच्या भागात हा अपघात घडला.

Bharat Jadhav

  • अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यात भीषण विमान अपघात.

  • डेलोना परिसरात दाट झाडीमध्ये विमान कोसळले.

  • अपघातग्रस्त विमान पायपर PA-46 प्रकारचे एक इंजिन असलेले विमान होते

अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यात एक भीषण विमान अपघात घडलाय. विस्कॉन्सिन डेल्सजवळील दाट झाडी असलेल्या भागावरून उड्डाण करताना एक छोटे विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेले, वेगाने खाली येत कोसळले. सॉक काउंटी शेरीफ विभागाच्या अधिकृत माहितीनुसार, मंगळवारी रात्री १० वाजण्यापूर्वी डेल्टन शहराच्या जवळ हा अपघात घडला.

हे अपघातग्रस्त विमान 'पायपर PA-46' (Piper PA-46) हे एक-इंजिन असलेले विमान होतं. हे विमान सहा प्रवासी वाहण्याची क्षमता होती. हे विमान केनोशा येथून उड्डाण करून मेनोमोनी शहराकडे निघाले होते. या विमान अपघातात ६ जणांचा मृत्यू झालाय. अपघात होण्यापूर्वी वैमानिकाने दिलेल्या अंतिम संदेशाबाबतची माहितीही समोर आली आहे.

रात्री साडे-नऊच्या सुमारास शेरीफच्या विभागाला विमान कोसळल्याबाबत किंवा विमान खाली पडत असल्याबाबत अनेक आपत्कालीन सूचना मिळाल्या. ही माहिती मिळताच पोलीस विभाग आणि आपत्कालीन बचाव पथके त्वरित कामाला लागले. विस्कॉन्सिन डेल्सला मिळालेल्या माहितीनुसार नैऋत्येला सुमारे दहा मैल अंतरावर असलेल्या, दाट जंगलात विमान कोसळल्याची माहिती मिळाली.

अपघाताची माहिती मिळताच मदत व बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा विमान पूर्णपणे जळून खाक झाले होते. सर्वत्र विमानाचे तुकडे पडले होते. बचाव पथकांनी केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार विमानात असलेल्या सहाही जणांचा मृत्यू झालाय. हवामान विभागाकडील प्राथमिक अहवाल आणि आकडेवारीनुसार, अपघात झाला, त्यावेळी त्या परिसरातील हवामान अत्यंत खराब होते. दाट ढगांच्या आच्छादनाखाली जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह भीषण वादळ घोंघावत होते. खराब हवामान आणि मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत असल्यानं हा विमान अपघात घडला असावा असा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान तपास अधिकाऱ्यांकडून अपघाताचं नेमकं काय कारण आहे हे याचा शोध घेतला जातोय.

पोलीस विभागानुसार अपघात होण्यापूर्वी काही काळ आधी हे विमान जवळच्याच 'एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर'च्या संपर्कात होते. विमान वाहतूक क्षेत्रातील अधिकारी आता एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत झालेला मागील ऑडिओ संवाद आणि इतर संपर्काची बारकाईने तपासणी केली जातेय. अपघात होण्यापूर्वी वैमानिकाने टॉवरशी केलेले अंतिम संभाषण नेमके कशाबद्दल होते. त्या शेवटच्या क्षणांत कॉकपिटमध्ये नेमकी काय परिस्थिती होती, हे शोधण्याचा ते प्रयत्न केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

73 लाख किलो, 295 कंटेनर, 30 कोटी किंमत; पाकिस्तानातून भारतात आणलेल्या खडेमिठाचा असा झाला पर्दाफाश

मोठी बातमी! समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी, नेमकं कारण काय?

Fact Check: दारूच्या एका बाटलीवर दुसरी बाटली फ्री? दारूच्या फ्री बॉटलसाठी दुकानांबाहेर रांगा

SCROLL FOR NEXT