Flight Glitch : ३७,००० फुटांवर तांत्रिक बिघाड;  ९ मिनिटांत २८,००० फूट खाली आले विमान,  'त्या' एका निर्णयाने टळला मोठा अपघात

British Airways : शिकागोहून लंडनला जाणाऱ्या British Airways BA295 विमानात ३७ हजार फूट उंचीवर तांत्रिक बिघाड झाला. विमानाने ७७०० इमर्जन्सी कोड पाठवल्यानंतर हीथ्रो विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले.
British Airways Flight Emergency BA295 Makes Safe Landing At Heathrow
British Airways Flight Emergency BA295 Makes Safe Landing At HeathrowAI Image
Published On: 
Summary
  • BA295 Boeing 777-200ER विमानात हवेत तांत्रिक बिघाड

  • सुमारे ३७ हजार फूट उंचीवर विमानाने 7700 इमर्जन्सी कोड पाठवला

  • अवघ्या ९.५ मिनिटांत विमान सुमारे ९ हजार फूट उंचीवर

  • विमानाचे वजन कमी करण्यासाठी सुमारे ३० टन इंधन हवेत सोडण्यात आले

शिकागोहून लंडनला जाणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला हवेतच आपत्कालीन परिस्थिती जाहीर करावी लागली. विशेष म्हणजे, सुमारे ३७ हजार फूट उंचीवर उड्डाण करत असताना विमानाने ७७०० हा इमर्जन्सी कोड पाठवला. त्यानंतर विमान वेगाने खाली येऊ लागले आणि अखेर लंडनच्या हीथ्रो विमानतळावर त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटिश एअरवेजचे BA295 हे विमान लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:५० च्या दरम्यान शिकागोच्या ओ'हारेला जाण्यासाठी रवाना झाले होते. हे Boeing 777-200ER विमान होते. त्याचा प्रवास सुमारे ८ तास ४० मिनिटांचा होता. उड्डाणानंतर सुमारे एका तासाने विमान आयर्लंडच्या हवाई क्षेत्रात ३७ हजार फूट उंचीवर पोहोचले. त्याचवेळी विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यानंतर विमानाने अचानक वेगाने खाली येण्यास सुरुवात केली. फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, अवघ्या ९.५ मिनिटांत विमान सुमारे ९ हजार फूट उंचीवर आले. परिस्थिती गंभीर होत असल्याने विमानाला पुन्हा हीथ्रो विमानतळाकडे वळवण्यात आले.

British Airways Flight Emergency BA295 Makes Safe Landing At Heathrow
Bribe Case : पोलीस अधिकाऱ्याने ₹१३०००० घेतले, पण अचानक ACB चं पथक धडकले, लाचखोर PSI कसा अडकला जाळ्यात

७७०० हा कोड का पाठवतात?

विमान सुरक्षितपणे उतरवण्यासाठी सुमारे ३० टन इंधन हवेत सोडण्यात आले, जेणेकरून विमानाचे वजन कमी होऊन आपत्कालीन लँडिंग अधिक सुरक्षितपणे करता येईल.आणि त्यानंतर विमानातील पायलटने ७७०० हा इमर्जन्सी कोड पाठवला. ७७०० हा आंतरराष्ट्रीय इमर्जन्सी ट्रान्सपॉन्डर कोड आहे. विमानाला कोणत्याही प्रकारची गंभीर आपत्कालीन अडचण निर्माण झाल्यास हा कोड पाठवला जातो. या कोडमधून नेमकी समस्या काय आहे हे समजत नाही, मात्र विमानाच्या क्रूला तातडीची मदत हवी असून विमानाचे तात्काळ लँडिंगची परवानगी आवश्यक असल्याचे एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळते.

British Airways Flight Emergency BA295 Makes Safe Landing At Heathrow
Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

सर्व प्रवासी सुखरूप

ब्रिटिश एअरवेजच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्रवासी आणि चालक दलाची सुरक्षा ही कंपनीसाठी महत्त्वाची आहे. तांत्रिक समस्येनंतर पायलटनी विमान हीथ्रो विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. प्रवाशांना विमानातून सामान्य पद्धतीने बाहेर काढण्यात आले असून त्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी टीम काम करत असल्याचेही कंपनीने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com