Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : आधी भांडण नंतर थेट विमानातून खाली उडी...; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल

Us Passenger Jump Out Of Plane : प्रवाशाच्या अशा कृत्यामुळे विमानात एकच खळबळ उडाली.

साम टिव्ही ब्युरो

Us Passenger Viral Video : अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्समधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका प्रवाशाने चक्क चालत्या विमानातून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवाशाच्या अशा कृत्यामुळे विमानात एकच खळबळ उडाली. (Viral Video)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी ही घटना घडली असून एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ देखील काढला आहे. विमानात प्रवास करत असताना एक प्रवासी आणि फ्लाईट अटेंडंट यांच्यात वाद झाला. यावेळी संतप्त प्रवाशाने फ्लाईट अटेंडंटला धक्काबुक्की देखील केली. ही सर्व घटना जिमेनेझ नावाच्या प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आहे.

सुरुवातीला बसण्याच्या जागेवरून प्रवाशी आणि त्याची पत्नी यांना समस्या होती. त्यावरून बातचीत सुरू असताना संतप्त प्रवाशाने फ्लाईट अटेंडंटशी अर्वाच्च शब्द वापरले. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाले. हे वाद सुरू असताना प्रवाशाला राग अनावर झाल्याने त्याने फ्लाईट अटेंडंटला धक्काबुक्की केली. यावेळी विमानात (Plane) एकच गोंधळ उडाला.

इतर सर्व प्रवाशी या दोघांची भांडणे पाहत होते. काही वेळाने घडलेल्या घटनेमुळे संतप्त प्रवाशाला फार वाईट वाटले. त्याने थेट आपत्कालीन एक्झीटमधून बाहेर उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इतर प्रवाशी प्रचंड घाबरले. अनेकांनी या प्रवाशाला रोखले आणि बाहेर उडी घेण्यापासून थांबवले.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागरिक देखील यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. आजवर तुम्ही ट्रेन आणि बस अशा ठिकाणी होणारी हाणामारी पहिली असेल. मात्र आता समोर आलेली घटना सर्वांच्याच काळजात धडकी भरवणारी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT