US News  Saam tv
देश विदेश

US News: अमेरिकेत ४१ देशांच्या नागरिकांना No Entry; ट्रम्प सरकारचा नवा आदेश

Not Entry In US : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा देशात प्रवासी बंदी घालण्याच्या तयारीत आहेत. वृत्तानुसार अमेरिकेने ४१ देशांच्या नागरिकांना बंदी घातलीय.

Bharat Jadhav

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे मोठं-मोठे निर्णय घेत आहेत. या निर्णयामुळे अख्या जगाला धक्के बसत आहेत. ट्रम्प सरकार अजून एक मोठा निर्णय घेणार आहे. यात एक नाही तर तब्बल ४१ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी करणार आहे. प्रवेश बंदी घालण्यात येणाऱ्या ४१ देशांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आलीय.

पहिली यादी

वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प लवकर एक नवा नियम पारित करणार आहेत. ज्यात पाकिस्तानसह ४१ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाहीये. यातील १० देशांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीत अफगाणिस्तान, इराण, सीरिया, क्युबा आणि उत्तर कोरियासारख्या अनेक देशांचा समावेश आहे. या देशांचे व्हिसा पूर्णपणे निलंबित केले जाणार आहेत.

दुसरी यादी

वृत्तानुसार, दुसऱ्या यादीत ५ देशांची नावे असतील ज्यांचे व्हिसा काही काळासाठी निलंबित केले जातील. या यादीत इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार आणि दक्षिण सुदानची नावे आहेत. या निर्णयामुळे पर्यटक आणि विद्यार्थी व्हिसा तसेच स्थलांतरित व्हिसावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

तिसरी यादी

प्रवेश बंदी करण्यात आलेल्या देशांच्या नावांची तीन यादी जाहीर करण्यात आलीय. तिसऱ्या यादीत पाकिस्तान आणि भूतान या देशांची नावे आहेत. या देशांतील नागरिकांच्या व्हिसावरही काही काळासाठी बंदी घालण्यात येणार आहे. जर या देशांच्या सरकारने ६० दिवसांच्या आत व्हिसातील सर्व कमतरता दूर केल्या नाहीत तर व्हिसा निलंबित केल्या जातील.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओसह संपूर्ण ट्रम्प प्रशासन या नवीन प्रवासी बंदीला मान्यता देऊ शकते. अमेरिकेत या कायद्याला मान्यता झाली तर अमेरिकेत जाणाऱ्या या ४१ देशांच्या नागरिकांना बंदी करण्यात येईल. याआधीही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात ७ मुस्लिम देशांवर प्रवासी बंदी घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT