
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशनसंबंधी कडक धोरण स्वीकारले आहे. याचदरम्यान तुर्कमेनिस्तानमधील अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या राजदुताला अमेरिकेत प्रवेश देण्यास नकार दिलाय. पाकिस्तानच्या राजदुताला विमानतळावरूनच माघारी पाठवलं. इंडिया टुडेला वृत्तानुसार,दिलेल्या माहितीनुसार, तुर्कमेनिस्तानच्या विमातळावरून पाकिस्तानचे राजदूत के.के. अहसान वगान यांना डिपोर्ट करण्यात आलंय.
इमिग्रेशनच्या आक्षेपामुळे अमेरिकन अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या राजदुताला देश सोडण्यास सांगितले. राजदूत के.के अहसान वगान यांच्याजवळ वैध अमेरिकेचा व्हिजा आणि सर्व आवश्यक कागदपत्र नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार ते लॉस एंजेलिसच्या दौऱ्यावर गेले होते, हा त्यांचा वैयक्तिक दौरा होता. परंतु अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना तुर्कमेनिस्तानच्या विमानतळावरच रोखलं आणि त्यांना तेथूनच डिपोर्ट करण्यात आले.
अमेरिकन प्रशासनाच्या निर्णयानंतर आता डिप्लोमॅटिक प्रोटोकॉलवर प्रश्न उपस्थित होताहेत. ही घटना गांभीर्याने घेत पाकिस्तान सरकार लवकरच राजदूत वगान यांना इस्लामाबादला परत बोलावून घेईल, अशी अपेक्षा आहे.
परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि परराष्ट्र सचिव अमिना बलोच यांना या घटनेची माहिती देण्यात आली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने लॉस एंजेलिसमधील पाकिस्तानी वाणिज्य दूतावासाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिलेत.
तुर्कमेनिस्तानमधील पाकिस्तानचे राजदूत के.के. अहसान वगान हे पाकिस्तानच्या परराष्ट्र सेवेत बऱ्याच काळापासून कार्यरत आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी काठमांडू येथील पाकिस्तानी दूतावासात द्वितीय सचिव म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी लॉस एंजेलिसमधील पाकिस्तानी वाणिज्य दूतावास, मस्कतमधील पाकिस्तानचे राजदूत आणि नायजरमधील पाकिस्तानी दूतावासात डेप्युटी कॉन्सुल जनरल म्हणूनही काम केले आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घालणार असल्याचं जाहीर केलं होतं. रॉयटर्सनं हे वृत्त दिलं होतं, या वृत्तानुसार पुढच्या आठवड्यापासून ही बंदी लागू होऊ शकते. या रिपोर्टनुसार ट्रम्प प्रशासनानं सुरक्षा आणि जोखिमाची समीक्षा केली त्यानंतर अमेरिकेत प्रवेश बंदीच्या देशांची यादी तयार केलीय. ट्रम्प सरकारने २० जानेवारी रोजी एक कार्यकारी आदेश जारी केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.