Lalit Modi: फरार ललित मोदींचे नागरिकत्व जाणार! वानुअतुच्या पंतप्रधानांकडून पासपोर्ट रद्द करण्याच्या सूचना

Lalit Modi Citizenship Controversy: फरार ललित मोदींना मोठा धक्का बसलाय. त्यांचे वानुआतुचे नागरिकत्व काढून घेतले जाणार आहे. वानुआतुचे पंतप्रधान जोथम नापट यांनी ललित मोदींचा पासपोर्ट रद्द करण्याच्या सूचना दिल्यात.
Lalit Modi Citizenship
Lalit Modi Citizenship Controversy:saam Tv
Published On

फरार ललित मोदींला मिळालेलं वानुआतु देशाचं नागरिकत्व काढून घेतले जाणार आहे. वानुआतुचे पंतप्रधान जोथम नापट यांनी ललित मोदींचा पासपोर्ट रद्द करण्याच्या सूचना दिल्यात. भारतातून पळून गेलेल्या ललित मोदीने नुकतेच आपले भारतीय नागरिकत्व सोडून वानुआतूचे नागरिकत्व घेतले होतं. मात्र तेथील पंतप्रधानांनी त्यांना मोठा धक्का दिलाय. पंतप्रधान जोथम नापट यांनी पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय दिल्याने हा भारताचा मोठा राजनैतिक विजय असल्याचं म्हटलं जात आहे.

पंतप्रधान जोथम नापट यांनी दिली माहिती

वानुआतुचे पंतप्रधान जोथम नापट यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबतची माहिती दिलीय. आपल्या प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहे की, आज नागरिकत्व आयोगाला ललित मोदींना दिलेला वानुआतुचा पासपोर्ट रद्द करण्याचे निर्देश देण्यात आलेत. पंतप्रधान नापट पुढे म्हणाले की, त्यांनी नागरिकत्व आयोगाला ललित मोदींचा वानुआतु पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिलेत.

Lalit Modi Citizenship
Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांचे अपहरण करणाऱ्या मुफ्तीची पाकिस्तानात हत्या

ललित मोदींविरुद्ध गुन्ह्यांची माहिती नाही

ललित मोदींनी पासपोर्टसाठी अर्ज केला. त्यानंतर सर्व काही तपासण्यात आले. यामध्ये इंटरपोल स्क्रिनिंगचाही समावेश होता. या तपासात त्याच्याविरुद्ध कोणतीही गुन्हेगारी सिद्धता आढळली नाही. पंतप्रधान म्हणाले की, इंटरपोलने भारत सरकारच्या विनंत्या दोनदा फेटाळल्या असल्याचं दिसून आले. त्यामागील कारण म्हणजे त्यांच्याविरुद्ध पुरेसे न्यायालयीन पुरावे नव्हते. जर तसं काही असते तर ललित मोदींचा नागरिकत्व अर्ज आपोआप फेटाळला गेला असता.मात्र नागरिकता देतांना कोणत्याच प्रकारचा गुन्हा ललित मोदींच्या नावावर कोणताच गुन्हा दिसून आला नव्हता.

Lalit Modi Citizenship
ED Raid: दारू घोटाळ्याप्रकरणी कारवाई ED ची कारवाई; माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापेमारी

काय आहे प्रकरण

भारत सरकारच्या ईडीने ललित मोदींविरुद्ध अनेक प्रकरणांची चौकशी सुरू केली होती. या आरोपात ललित मोदी, बीसीसीआय आणि इतर काही अधिकाऱ्यांवर FEMAचे उल्लंघन करून 890 दशलक्ष रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. तर ललित मोदींनी याप्रकरणी बीसीसीआयचे कोषाध्यक्ष एन श्रीनिवासन यांना जबाबदार धरले होते. यूकेस्थित इमर्जिंग मीडियाकडून 200 दशलक्ष रुपयांची लाच घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. तसेच 2009 च्या आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 2.43 अब्ज रुपये दिले गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com