US warships deployed near the Strait of Hormuz amid rising tensions with Iran Saam Tv
देश विदेश

इराणविरोधातील युद्धात अमेरिकेची दुटप्पी भूमिका, डोनाल्ड ट्रम्प युद्धविरामाच्या तयारीत?

Iran Israel Conflict: इराणला गुडघ्यावर आणण्यासाठी अमेरिकेनं जगाला युद्धाच्या खाईत लोटलं. मात्र, याच अमेरिकेनं आता दुटप्पी भूमिका घेत संपूर्ण जगाला कसं बुचकळ्यात पाडलंय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

अमेरिका - इराण युध्दाला 21 दिवस झाल्यानंतर इराणनं अमेरिकेला होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये जेरीस आणलंय का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. याचं कारण, इराणला गुडघ्यावर आणण्यासाठी आकाश-पाताळ एक करणाऱ्या अमेरिकेनं एक पाऊल मागे येण्याचे सुतोवाच केलेत. होर्मुझ सामुद्रधुनीतून अत्यल्प प्रमाणात तेल आय़ात करणाऱ्या अमेरिकेनं आता नवी भूमिका जाहीर केलीय.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मवाळ भूमिका घेतली असली तरी इराणच्या भूमीत थेट मरीन कमांडो उतरवण्याच्या अमेरिकेच्या हालचालींकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही. तसंच, याआधीच मध्य पूर्वेत बलाढ्य अमेरिकेनं शक्तिशाली युद्धनौका तैनात केल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे, आखाती युद्धानंतर होर्मुझ सामुद्रधुनी प्रदेशात अमेरिकेनं आजवरचं सर्वात जास्त सैन्य तैनात केलं आहे.

दरम्यान, युएसएस बॉक्सर, युएसएस पोर्टलँड आणि युएसएस कॉमस्टॉक यांसारख्या जहाजांवर अंदाजे 4000 सैनिक आहेत. युएसएस जेराल्ड आर. फोर्ड, युएसएस अब्राहम लिंकन आणि युएसएस हॅरी एस. ट्रुमन या आधीच तेथे तैनात केले आहेत. त्यांच्यासोबत 200 हून अधिक लढाऊ विमाने आणि अंदाजे 20000 खलाशी आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'होर्मुझची सामुद्रधुनी' सुरक्षित ठेवणं हे आमचं काम नाही, असं म्हणतानाच दुसरीकडे इराणच्या दिशेने आपली महाकाय जहाजे रवाना केली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ट्रम्प जगाची दिशाभुल करताहेत की खरोखरच माघार घेऊन युध्द थांबवण्याच्या तयारीत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्यांचा सत्कार करणार

Sunday Horoscope : आज 'या' राशींना मिळणार मोठी संधी; कामाचा ताण होणार कमी, वाचा रविवारचे राशीभविष्य

Weather Update : ऊन-सावल्यांचा खेळ अन् विजांचा कडकडाट! महाराष्ट्रातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा, जाणून घ्या आजचे हवामान

Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका लहान मुलांमध्ये का वाढतोय? 'या' ६ कारणांकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर...

पेपरफुटीच्या घटनांनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; भरती प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

SCROLL FOR NEXT