दिल्ली|ता. २३ एप्रिल २०२४
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मानवी हक्कांबाबतचा जगातील प्रमुख देशांचा वार्षिक अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये मणिपूरमधील हिंसाचार, राहुल गांधी यांना झालेली शिक्षा तसेच बीबीसीवरील छापेमारीचा दाखला देत मानवी हक्कांचे उल्लघंन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी मानवी हक्कांबाबतचा अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये भारत आणि भारतातील घटनांबाबत एक वेगळा विभाग करून भारतात झालेल्या मानवी हिंसाचाराबाबत भाष्य करण्यात आले आहे. ज्यामध्ये विविध घटनांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
या अहवालामध्ये मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात भारत सरकार आणि मणिूपरमधील राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर बीबीसी इंडियाच्या कार्यालयावर टाकलेले छापे, सुरत न्यायालयाने राहुल गांधींना ठोठावलेली दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा या घटनांवरुनही भाष्य करण्यात आले आहे.
तसेच मुस्लिम बांधवाना जुलै 2023 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये मोहरम दरम्यान धार्मिक मिरवणूक काढण्याची परवानगी होती. या मिरवणुकीवर 1989 मध्ये बंदी घालण्यात आली होती. अमेरिका यापूर्वीही 'चुकीची माहिती आणि सदोष समजुती'च्या आधारे भारताला मानवाधिकारांचे ज्ञान देत आहे, जी भारताने नाकारली आहे, असेही या अहवालामध्ये म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.