अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या संदर्भात लोक अनेक गोष्टी जाणून घेत आहेत. यातील एक गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षांना किती मानधन मिळतं? भारतीय राष्ट्रपतींपेक्षा जास्त पगार असतो का? असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. दरम्यान राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
काही जाणकार म्हणतात की, कमला हॅरिस ह्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होतील. तर थायलंडचे मू देंग हिप्पो यांच्या भविष्यवाणीनुसार डोनाल्ड ट्रम्प हे कमला हॅरिस यांना पराभूत करत परत एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील. परंतु या दोघांपैकी कोणीही राष्ट्राध्यक्ष बनले तरी त्यांना किती मानधन मिळते या प्रश्नांच उत्तर नेटकरी सध्या शोधत आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना वार्षिक ४ लाख डॉलर (३.३६ कोटी रुपये) मिळतात. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनाही इतकेच वेतन मिळते. राष्ट्राध्यक्षांना खर्चासाठी वेगळे ५० हजार डॉलर म्हणजेच ४२ लाख रुपये पैसे दिले जातात. वॉशिंग्टन डीसीमध्ये असलेल्या व्हाइट हाऊसमध्ये राहणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना खर्च करण्यासाठी स्वत: चा पैसा वापरण्याची गरज नसते. जेव्हा राष्ट्राध्यक्ष व्हाइट हाऊसमध्ये राहायला जातात तेव्हा त्यांना १ लाख डॉलर ८४ लाख रुपये मिळतील. याचा उपयोग व्हाइट हाऊस सजवण्यासाठी केला जातो.
यासह राष्ट्राध्यक्षांना इतर सुविधा देखील मिळतात. मनोरंजन, स्टाफ आणि स्वंयपाकीसाठी वर्षाकाठी १९,००० डॉलर म्हणजे ६० लाख रुपये खर्च करण्यास मिळत असतात. राष्ट्राध्यक्षांना सर्व आरोग्याच्या सुविधा फ्री मिळत असतात. राष्ट्राध्यक्षांना प्रवासासाठी कार, एक मरीन हेलिकॉप्टर आणि एक विमान दिलं जातं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ४ लाख डॉलर सॅलरी २००१ पासून मिळत आहे.
भारतामध्येही राष्ट्रापतीपद हे सर्वात मोठं आणि महत्त्वाचं पद आहे. ११ सप्टेंबर २००८ पासून भारत सरकारने भारताच्या राष्ट्रपतीचं वेतन करण्यात आलं होतं. त्यानुसार राष्ट्रपतींचं वेतन आता १.५० लाख रुपये करण्यात आलंय. तर २०२२ मध्ये राष्ट्रपतींच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. आता राष्ट्पतींना ३.९ लाख रुपये पगार दिला जात आहे. यानंतर २०१८ मधील केंद्रीय बजेटमध्ये राष्ट्रपतींच्या पगारात वाढ करण्यात आलीय. त्यानुसार ५ लाख आणि २०२४ मध्ये ५.९ लाख रुपये पगार करण्यात आलाय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणेच भारताच्या राष्ट्रपतींना आरोग्य सेवा मोफत मिळत असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.