Arrest of Venezuelan President Maduro explained Saam Tv
देश विदेश

अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला, व्हेनेझुएलावर अमेरिकेची सत्ता

US Airstrikes on Venezuela:हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी व्हेनेझुएला देशावर अमेरिकेची सत्ता असेल असं विधान केलंय. मात्र व्हेनेझुएलावर हल्ला करण्याआधी ट्रम्पनं नेमकी काय रणनीती आखली? व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्य़ावेळी नेमकं काय घडलं?

Suprim Maskar

हा विध्वसंक हल्ला झालाय.... व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसमध्ये...2 जानेवारीच्या मध्यरात्री अमेरिकेने व्हेनेझुएलावर थेट लष्करी आक्रमण केलं...अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकस आणि लष्करी तळांवर भीषण बॉम्बहल्ला केला. एक दोन नव्हे तर तब्बल 7 ठिकाणी अमेरिकेनं बॉम्ब हल्ले केले. त्यामुळे 30 मिनटं चाललेल्या कारवाईनंतर संपूर्ण व्हेनेझुएलामध्ये भीतीचे वातावरण पसरलं... व्हेनेझुएलामध्ये तातडीने देशव्यापी आणीबाणी जाहीर केली...

या हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोल मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोर्स यांना ताब्यात घेऊन अमेरिकनं सैन्याने दोघांनाही थेट इवो जिमा या युध्दनौकेवर नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना अमेरिकेत आणून न्यूयॉर्कमधील जेलमध्ये डांबण्यात आलयं..

अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला

अमेरिकेच्या मिशनचं नाव 'सदर्न स्पीअर'

ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातच मादुरो यांना पकडण्यासाठी मिशनची तयारी

राष्ट्रपती मादुरो यांच्यावर आधीच अमेरिकेकडून कोट्यवधींचा इनाम जाहीर

मिशनमध्ये अमेरिकेच्या 150 विमानांचा समावेश

'गेराल्ड आर फोर्ड' विमानवाहू नौकेसह नौदलाच्या युद्धनौकांचाही हल्ल्यात समावेश...

व्हेनेझुएलच्या हल्ल्यात आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती

अमेरिकी लष्करांच्या 'डेल्टा फोर्स'कडून मिशन यशस्वी

दरम्यान, मादुरो यांच्या अटकेनंतर आता जगभरातून प्रतिक्रिया उमटतायत...अमेरिकेतील विरोधी पक्षांनी ट्रम्प यांच्यावर टीका केलीय...काही देशांनी समतोल भूमिका घेत ट्रम्प यांना थेट विरोधी करण्याचे टाळले आहे. मात्र, व्हेनेझुएलातील अस्थिर राजकीय स्थितीचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची भीती आता व्यक्त केली जातेय...

व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठा तेलसाठा आहे. त्यामुळे या घटनेमुळे तेलाच्या किंमती 6 ते 7 टक्क्यांनी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय...त्यामुळे हा संघर्ष कधी निवळणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2026: मुंबईत मनसेला भगदाड, भाजपनंतर शिवसेनेकडून धक्का, शेकडो पदाधिकारी शिंदेसेनेत

Destination Wedding Places : डेस्टिनेशन वेडिंग प्लान करताय? ही आहेत भन्नाट लोकेशन्स

Film Director Death: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Irrfan Khan Birth Anniversary : इरफान खानने वाचवला होता जीव; आज 'तो' आहे IPS ऑफिसर, नेमका किस्सा काय?

Hairstyle Ideas: मकर संक्रांतीला काळ्या साडीवर खुलून दिसतील 'या' 5 हेअरस्टाईल्स; पारंपारिक लूकला मिळेल मॉडर्न टच

SCROLL FOR NEXT