वृत्तसंस्था: एकीकडे रशियन (Russian) समुद्रामध्ये, युरोप (Europe) सीमलगत कोणत्याही क्षणी जागतिक युद्धाला तोड फुटण्याची शक्यता आहे. चीनच्या (China) समुद्रात मोठी घटना घडली आहे. अमेरिकेचे (America) अद्ययावत लढाऊ विमान एफ- 35 कोसळले आहे. यामध्ये पायलट (Pilot) वाचला असला तरी 7 जवान जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवर हा भयानक अपघात (Accident) झाला आहे. लढाऊ विमान धावपट्टीवर (runway) उतरत असताना हा अपघात झाला आहे, पायलटने वेळेवर बाहेर पडण्याचे बटन दाबल्यामुळे तो वाचला आहे. (US Air Force F 35 fighter jet crashes)
हे देखील पहा-
अमेरिकन (America) नौदलानुसार हेलिकॉप्टरद्वारे (helicopter) त्याला लगेच समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. हा अपघात काल झाला आहे. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार की, एफ- 35 सी लाइटनिंग- 2 हे लढाऊ विमान युद्धनौका युएसएस कार्ल विंसनवर उतरवत असताना हा अपघात झाला आहे. हे लढाऊ विमान दक्षिण चीन समुद्राकडे (sea) रोजच्या उड्डाणाकरिता गेले होते. विमान उतरत असताना नौदलाचे 7 जवान तिथे उपस्थित होते. ते जखमी झाले आहेत.
यापैकी 3 जवानांना फिलिपिन्सची राजधानी मनिला येथील मेडिकल (Medical) ट्रिटमेंट फॅसिलिटी सेंटरमध्ये उपचाराकरिता हलविण्यात आले आहे. तर उर्वरित 4 जवानांवर युद्धनौकेवर उपचार घेत आहेत. दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनबरोबर तणावाने अमेरिकेने आपली २ विमानवाहू युद्धनौका तैनात केलेले आहेत. चीन आपल्या संपूर्ण भूभागावर दावा करत आहे. त्यावेळी, या प्रदेशामधील इतर देश त्यांचा दावा करत आहेत. दक्षिण चीन समुद्रावरून चीन आणि अमेरिका अनेकवेळा आमने- सामने आले आहेत. तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.