Assault by Husband’s Friend in Bareilly Saam Tv News
देश विदेश

Crime: मित्राला दारू पाजायचा नंतर त्याच्या बायकोशी शारीरिक संबंध...; असा आला आरोपीचा खरा चेहरा समोर

Assault by Husband’s Friend in Bareilly: बरेलीमध्ये नवऱ्याच्या मित्राने लग्नाचं आमिष दाखवून महिलेसोबत लैंगिक शोषण केल्याची घटना उघड. पोलिसांत तक्रार दाखल; आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

नवऱ्याच्या मित्रानेच लग्नाची भूलथाप देऊन शारीरिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पीडित महिलेच्या पतीला दारू पाजायचा. नंतर महिलेसोबत जबरदस्ती लैंगिक शोषण करायचा. महिलेने विरोध केल्यास तिला बेदम मारहाण करण्यात येत होती. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील सीबीगंज पोलीस स्टेशन परिसरात घडली असून, पीडितेनं आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ४० वर्षांची आहे. तसेच उदरनिर्वाहसाठी घरकाम करते. तर तिचा पती मजूर आहे. महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडितेच्या पतीची पलू नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. आरोपी वारंवार त्यांच्या घरी येत होता. हळूहळू त्यानं पीडितेच्या पतीला दारू पाजण्यास सुरूवात केली. आरोपीनं त्यानंतर महिलेसोबत अश्लील वर्तन सुरू केले.

नंतर हळूहळू गोड बोलून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिचा विश्वास संपादित केला. तसेच तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवलं. पलू वारंवार पीडितेच्या पतीला दारू पाजत असे. तसेच महिलेचे लैंगिक शोषण केले. अनेक महिने हा प्रकार सुरू होता. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दागिने, या गोष्टी देऊ लागला. पण कालांतराने महिलेला पलूचं खरं रूप दिसलं. तिनं त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला.

त्यावेळी आरोपीला राग अनावर झाला. त्यानं थेट महिलेला मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर महिलेनं सीबीगंज पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून, आरोपी पलूला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT