UP Special Task Force killed Gangster Anil Dujana saam tv
देश विदेश

UP STF killed Gangster: उत्तर प्रदेशात आणखी एका गँगस्टरचं एन्काउंटर! मेरठमध्ये STF सोबत चकमकीत कुख्यात गुंड ठार

Gangster Anil Dujana killed in encounter with STF : अनिल दुजाना हा ग्रेटर नोएडातील बदलपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी होता आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये त्याची खूप दहशत होती.

Chandrakant Jagtap

UP Special Task Force killed Gangster Anil Dujana: उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एका गँगस्टरचं एन्काउंटर केलं आहे. कुख्यात गुंड अनिल दुजाना उर्फ ​​अनिल नागर याचा यूपी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (UP STF) मेरठमध्ये चकमकीत खात्मा केला. यूपी एसटीएफने चकमकीनंतर अनिल दुजानाला ठार केल्याची माहिती दिली आहे. अनिल दुजाना हा ग्रेटर नोएडातील बदलपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी होता आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये त्याची खूप दहशत होती.

पळून जाण्याच्या प्रयत्नात होता

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल दुजाना मेरठमधील भोला झाल येथे सक्रिय असल्याची ठोस माहिती उत्तर प्रदेश एसटीएफला मिळाली होती. त्यानंतर एसटीएफने कारवाई करत त्याला घेराव घातला. यानंतर अनिल दुजाना याने पोलिसांवर गोळीबार सुरू केला आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तात पोलिसांनीही गोळीबार केला. या चकमकीत तो ठार झाला.

कोण होता अनिल दुजाना?

कुख्यात गुंड अनिल दुजाना हा ग्रेटर नोएडातील बदलपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी होता आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये त्याची खूप दहशत होती. त्याच्याविरुद्ध ६० हून अधिक गुन्हे दाखल असून पोलीस त्याचा बराच काळापासून शोध घेत होते. अनिल दुजाना याच्याविरुद्ध खंडणी, लूटमार, जमीन बळकावणे आणि शस्त्रास्त्र कायद्यासारख्या गंभीर कलमांतर्गत ६० हून अधिक दाखल आहेत, यात १८ खूनांचा समावेश आहे. पश्चिम उत्तर प्रदेश व्यतिरिक्त, दिल्ली-एनसीआरमध्येही त्याची दहशत होती आणि तो अनेक प्रकरणांमध्ये मोस्ट वॉन्टेड होता.

सुंदर भाटी टोळीशी होतं वैर

कुख्यात गुंड अनिल दुजाना याचं कुख्यात माफिया सुंदर भाटी आणि त्याच्या टोळीशी शत्रुत्व होतं. २०१२ मध्ये अनिल दुजाना टोळीने सुंदर भाटी आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर हल्ला केला होता. या दोघांच्या वैमनस्यातून अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत. सुंदर भाटीचे नाव नुकतेच अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येशी जोडले गेले होते.

यूपी सरकारच्या काळात १८६ एनकाउंटर

यूपी पोलिसांनी अनिल दुजानावर रासुका आणि गँगस्टर अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. नुकतीच गौतम बुद्ध नगरमधील गुंडांची यादी पोलिसांनी उघड केली होती. त्यात दुजानाच्या नावाचाही समावेश होता. दरम्यान या एन्काउंटरसह योगी सरकारच्या काळात १८६ चकमकी झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT