Heartbreaking scene from Kaushambi — a mother passes away after hearing the tragic news of her son’s death before Diwali. saamtv
देश विदेश

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Uttar Pradesh News: प्रयागराजमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय.ब्रेन हॅमरेजमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच आईचेही निधन झाल्याची घटना कौशांबी येथे घडलीय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून गावात शोककळा पसरली आहे.

Bharat Jadhav

  • कौशांबी जिल्ह्यात आई-मुलाच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

  • मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही प्राण सोडले.

  • दिवाळीच्या आधीच घडलेल्या या घटनेनं संपूर्ण गाव शोककळा पसरली आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा सण. या प्रकाशाच्या सणाच्या आधी कौशांबी येथील एका कुटुंबावर दुःखाचा दु:खाचा डोंगर कोसळलाय. आई आणि मुलाच्या मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. ब्रेन हॅमरेजमुळे मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच आईलाही मोठा धक्का बसला. लेकाच्या मृत्यूचा धक्का पचवून न शकल्याने आईनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना देवीगंजमध्ये घडली. कडाधाम पोलीस स्टेशन परिसरातील देवीगंज गाव येते.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदकिशोर अग्रहरि हे एक धान्य व्यापारी आहेत. त्यांना दोन मुलं आहेत, हरिश्चंद्र आणि गुड्डू अग्रहरी. मोठा मुलगा हरिश्चंद्र याला सुमारे १० दिवसांपूर्वी मेंदूचा झटका आला होता, त्यानंतर त्याला प्रयागराजमधील फिनिक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. अगदी दिवाळीच्या आधीच हरिश्चंद्र यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ही बातमी देवीगंज येथील नंदकिशोरच्या घरी पोहोचताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. हरिश्चंद्रच्या आईला मुलाच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला.

त्या हंबरडा फोडून रडू लागल्या. लेकाचा मृत्यू झाल्याचा दु: ख इतकं होतं त्या मोठं मोठ्या छाती ठोकत ठोकत रडू लागल्या. रडता रडता त्या जमिनीवर पडल्या. त्यावेळी कुटुंबातील इतर लोकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सर्व काही व्यर्थ गेले. त्यानंतर डॉक्टरांना बोलवण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दिवाळीच्या सणात प्रत्येकाच्या घरात सुख समृद्धी भरभराटी येत असते. प्रकाशमय असणाऱ्या या सणाच्या दिवशी नंदकिशोर अग्रहरि यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. मुलाच्या मृत्यूसह पत्नीचाही मृत्यू झाल्यानं त्यांच्या पायाखालची जमीन सरकून गेली आहे. या दुःखद घटनेची माहिती मिळताच, पोलिस स्टेशन अधिकारी धीरेंद्र सिंह यांनी सांगितले की मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण, बोगस मतदान केल्याचा आरोप; VIDEO समोर

लग्नात आकर्षक लूक हवा? पाहा पैठणी साडीचे ८ युनिक डिजाईन्स; जाणून घ्या किंमत

Chanakya Niti: फसव्या महिलांना कसे ओळखावे? आचार्य चाणक्यांनी सांगितले 7 महत्त्वाचे मार्ग

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर मतदारांची उसळली मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT