UP News  Saam Digital
देश विदेश

UP News : परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व्हॅन धडकली झाडाला; ४ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

UP Accident News : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली व्हॅन झाडावर आदळल्याची घटना घडली आहे . या भीषण अपघातात हायस्कूलच्या परीक्षेला बसलेल्या ४ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अर्धा डझनहून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Sandeep Gawade

UP News

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली व्हॅन झाडावर आदळल्याची घटना घडली आहे . या भीषण अपघातात हायस्कूलच्या परीक्षेला बसलेल्या ४ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अर्धा डझनहून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

ही घटना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जारवण गावाजवळ घडली. हायस्कूलची मुलं-मुली युको व्हॅनमधून जैतीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील लातुरी सिंग इंटर कॉलेजमध्ये परीक्षेसाठी जात होते. यावेळी अचानक एक भटका प्राणी व्हॅनसमोर आला. या प्राण्याला वाचवण्यासाठी चालकाने अचानक कार वळवली. त्यामुळे व्हॅनवरचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट झाडाला जावून आदळली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघातात हायस्कूलची दोन मुले आणि दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना कसंबसं व्हॅनमधून बाहेर काढण्यात आलं. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. विद्यार्थी सकाळी परीक्षा देणार होते. व्हॅनचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. तर 6 विद्यार्थी जखमी झाले आहेत. व्हॅनमध्ये 10 विद्यार्थी होते. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती एसपी सिटी संजय कुमार यांनी दिली. मात्र चालकाने जनावर मार्गात आल्यामुळे अपघात झाल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT