कोणी सिनेअभिनेत्याने राजकारणात येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. हा ट्रेंड जुना असून अशा बातम्या वेळोवेळी येत असतात. कधी एखादा मोठा सेलिब्रिटी चित्रपट सोडून राजकारणात येतो तर कधी या बातम्या खोट्या निघत असतात. अक्षय कुमार राजकारणात सामील होणार असल्याच्या बातम्यांनी जोर पकडलाय. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसंदर्भात एक मोठी बातमी हाती आलीय. चित्रपट क्षेत्रात सुपरहिट ठरलेला अभिनेता अक्षय कुमार राजकारणाच्या क्षेत्रातही आपला जलवा दाखवणार असल्याचं म्हटलं जात आहे.(Latest News)
अभिनेता अक्षय कुमार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. भाजपकडून अक्षय कुमारला लोकसभेसाठी तिकीट मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत जागा वाटपासाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्येही वाटाघाटी झाल्या आहेत. यामुळे दिल्लीचं रण मारण्यासाठी भाजपने तयारी सुरू केलीय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कोणत्या जागेवर कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यावी याची चाचपणी केली जातेय. यावेळी काही जागांवर नवे चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खासदारांचा ट्रॅक रेकॉर्ड, एमसीडी निवडणुकीतील पराभव आणि काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन भाजप यावेळी दिल्लीतील लोकसभेच्या ५ किंवा कदाचित ७ही जागांवर नवे चेहरे उभे केले जाऊ शकतात, अशी चर्चा जोर धरू लागलीय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी दोन जागांवर महिला चेहरेही दिसू शकतात. तसेच केंद्रीय मंत्र्यालाही उभे केले जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) बॉलिवूड (Bollywood) अभिनेता (Actor) अक्षय कुमारला तिकीट देऊ शकते, असं म्हटलं जातंय. उत्तर पूर्व, पूर्व, चांदणी चौक, उत्तर पश्चिम यासह नवी दिल्लीच्या या ७ जागांची सर्वाधिक चर्चा सुरूय. ईशान्य दिल्लीचे विद्यमान खासदार मनोज तिवारी यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळणार नसल्याचं बोलले जात आहे.
दुसरीकडे चांदणी चौक जागेबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाहीये. दिल्लीच्या चांदनी चौकातूनही अक्षय कुमारला तिकीट मिळू शकते. कारण तो त्या मतदारसंघातून राहिलेला असून तेथे त्यांचं बालपण गेले आहे. तेथूनच तो मोठा सुपरस्टार झालाय. त्यामुळे त्या ठिकाणाहून त्याला तिकीट देणं भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतं. अक्षय कुमारला भाजप का तिकीट देणार यामागे अनेक कारणे आहेत. एकतर अक्षय कुमार ( Akshay Kumar) अनेकदा जाहीरपणे देशाच्या पंतप्रधानांची प्रशंसा केलीय. इतकंच नाही तर अक्षय कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Prime Minister) सोबत दिसलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.