Chandrashekhar Azad News Saam Tv
देश विदेश

Chandrashekhar Azad News: 'मी मृत्यूशी झुंज देत होतो, मात्र आरोपी अद्याप मोकाट फिरतायत,' हल्ल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांची पहिली प्रतिक्रिया

'मी मृत्यूशी झुंज देत होतो, मात्र आरोपी अद्याप मोकाट फिरतायत,' हल्ल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांची पहिली प्रतिक्रिया

Satish Kengar

Chandra Shekhar Azad First Reaction on Attack: भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना गुरुवारी सहारनपूर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारच्या संरक्षणाशिवाय हा हल्ला होऊ शकत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

चंद्रशेखर यांनी गुरुवारी रुग्णालयातून बाहेर येताच माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ''हा आजचा हल्ला नाही, वंचितांवर शतकानुशतके हल्ले होत आहेत, पण आज कायद्याचे राज्य आहे. माझ्यासारख्या माणसाच्या बाबतीत हे घडत असताना कायदा आणि सुव्यवस्थेची काय स्थिती आहे?'' यादरम्यान आझाद यांनी विचारले की, गेल्या २४ तासांत काय कारवाई करण्यात आली?

ते म्हणाले की, आरोप अद्यापही मोकाट फिरत आहेत. ''सत्तेच्या संरक्षणाशिवाय हे घडू शकत नाही. याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. या घटनेवर मुख्यमंत्री काही न बोलल्याने ते गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचं स्पष्ट होतं.'' प्रशासनावर निशाणा साधत ते म्हणाले की, ''मी राणीचा मुलगा नाही, हे आयुक्तांचे कुत्र्याचे प्रकरण नाही, ज्यावर तातडीने कारवाई केली जाईल.'' (Latest Marathi News)

आझाद यांच्या कारवर झाला होता गोळीबार

दरम्यान, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर बुधवारी सहारनपूरमध्ये दिल्लीत परतत असताना हल्ला झाला. कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. गोळीबारात एक गोळी चंद्रशेखर यांच्या गाडीच्या दारात घुसली. तर एक गोळी कारच्या काचेवर लागली. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हरियाणा क्रमांकाच्या कारमध्ये आले होते. त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या कारसमोर गाडी लावली. काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी यावेळी एकूण चार राऊंड फायर केले. या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatataraka Nakshatra : कुंभ राशीचे रहस्य; शततारका नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Horoscope: आयुष्यात घडतील आश्चर्यकारक गोष्टी; व्यवसायात दुप्पट प्रगती, वाढेल आदर,जाणून घ्या राशीभविष्य

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT