Sharad Pawar Press Conference: गृहमंत्र्यांनी इतर वक्तव्ये करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

Sharad Pawar On Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar NCP News
Sharad Pawar NCP NewsSaam tv news
Published On

Sharad Pawar press conference Live in Pune : राज्याच्या गृहमंत्र्यांनी इतर वक्तव्ये करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला. पवार म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चिंतेचा बनला आहे. माहिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. महिला आणि मुलींवरील हल्ले वाढले आहेत. 23 जानेवारी ते 23 मे दरम्यान ठाण्यातून 721 महिला बेपत्ता झाल्या, तर पुण्यातून 937 महिला गायब आहेत. याच काळात मुंबईतून 738 महिला बेपत्ता आहेत. (Marathi Tajya Batmya)

Sharad Pawar NCP News
Lok Sabha Election 2024: क्रिकेट, गुगली, विकेट; पहाटेच्या शपथविधीवरील फडणवीसांच्या गौप्यस्फोटावरून शरद पवारांचा उत्तुंग षटकार

पवारांनी राज्यातील महिलांची देखील आकडेवारी मांडली. सोलापूरमधून 62 बेपत्ता आहेत. सगळ्या मिळून 2,458 मुली आणि महिला या चार महापालिका क्षेत्रात गेल्या सहा महिन्यात गायब झाल्या आहेत. पुणे ग्रामीण, वाशिम, रायगड, अमरावती, बीड, चंद्रपूर, जळगाव, भंडारा, रत्नागिरी आणि गोंदिया या 14 जिल्ह्यात 23 जानेवारी ते 23 मे हा सर्व काळ आणि त्यानंतर 4421 मुली बेपत्ता आहेत, असे पवार म्हणाले. (Latest Political News)

Sharad Pawar NCP News
Devendra Fadnavis Statement: रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ? अलिबागमधील 19 बंगला घोटाळ्याप्रकरणी फडणवीसांचं मोठं वक्तव्य

पवार म्हणाले, राज्यातून गेल्या दीड वर्षात 6 हजार 889 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी इतर वक्तव्ये करण्यापेक्षा या महिला कशा बेपत्ता झाल्या? त्यांचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली कशा करता येईल यासाठी उपाय करावेत असे पवार म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com