Lok Sabha Election 2024: क्रिकेट, गुगली, विकेट; पहाटेच्या शपथविधीवरील फडणवीसांच्या गौप्यस्फोटावरून शरद पवारांचा उत्तुंग षटकार

शिवसेना-भाजप लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Devendra Fadnavis on Shiv Sena - Bjp Seat Sharing Formula
Devendra Fadnavis on Shiv Sena - Bjp Seat Sharing FormulaSaam Tv
Published On

Devendra Fadnavis on Shiv Sena - Bjp Seat Sharing Formula: ''शिवसेना आणि भाजपचा जो जागावाटपाचा फॉर्म्युला होता, त्याचप्रमाणे जागावाटप होईल. त्याच्यासोबत (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) जितके खासदार आले आहेत, त्या जागा त्यांनाच मिळणार'', असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले आहेत. रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले आहेत.

फडणवीस म्हणाले की, ''शिवसेना ज्या जागेवरून निवडणूक लढवत होती, त्या ठिकाणी त्यांच्याकडे योग्य उमेदवार असल्यास, ती जागा त्यांना मिळणार. आम्ही जिथे निवडणूक लढवत होतो, त्या जागा आम्हाला मिळणार. विधानसभेतही जवळपास हाच फॉर्म्युला वापरला जाईल. याबाबतच्या सगळ्या गोष्टी आमच्या मनात स्पष्ट आहेत.''

Devendra Fadnavis on Shiv Sena - Bjp Seat Sharing Formula
Devendra Fadnavis Statement: रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ? अलिबागमधील 19 बंगला घोटाळ्याप्रकरणी फडणवीसांचं मोठं वक्तव्य

'कल्याण लोकसभा जागेवर श्रीकांत शिंदे हेच निवडणूक लढवणार'

कल्याण लोकसभा जागेवरून काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजप आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. यावर बोलता उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''कधी-कधी स्थानिक पातळीवर समस्या निर्माण होतात.'' ते म्हणाले, ''आमची तिथे एक सभा झाली, ज्यात कार्यकर्त्यांनी मागणी केली की, या जागेवरून भाजपने निवडणूक लढवायला हवी. आमच्या नेत्यांनीही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी म्हटलं, हो आपण लढवूच. मात्र या गोष्टी एकाजागी आणि वास्तविकता आपल्या जागी आहे.'' (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''कार्यकर्त्यांनी अशी मागणी करणं चुकीचं नाही. मात्र ही गोष्ट निश्चित आहे की, कल्याणच्या जागेवरून श्रीकांत शिंदे हेच निवडणूक लढतील. हे आमच्या नेत्यांनाही माहित आहे.''

Devendra Fadnavis on Shiv Sena - Bjp Seat Sharing Formula
Sanjay Raut On Devendra Fadnavis: तुमचा प्रयोग फसला ही एका ओळीची गोष्ट, फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला संजय राऊतांचे उत्तर

ते म्हणाले, ''जेव्हा श्रीकांत शिंदे यांना विचारण्यात आलं की, भाजपकडून अशी मागणी होत आहे. त्यावेळी ते म्हणाले, कोणी इतर असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. मी मान्य करतो की, अशा गोष्टी सार्वजनिकपणे नाही झाल्या पाहिजे. मात्र ही गोष्ट म्हणजे फक्त गैरसमज होती, दुसरं काही नाही.''

काय आहे देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षा?

या मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले आहेत की, ''माझी महत्वाकांक्षा आहे की, 2024 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 42 किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकणे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सुपडा साफ करणं, ही माझी महत्वाकांक्षा आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com