Sharad Pawar on Devendra Fadnavis: क्रिकेट, गुगली, विकेट; पहाटेच्या शपथविधीवरील फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांचा उत्तुंग षटकार

'..तर चोरून पहाटे शपथ घेण्याची काय गरज होती', शरद पवारांनी फडणवीसांना सुनावलं...
Sharad Pawar on Devendra Fadnavis
Sharad Pawar on Devendra FadnavisSaam Tv

Sharad Pawar Latest Press Conference: ''आमच्यात (NCP - BJP) अनेक गोष्टींची चर्चा झाली. ही गोष्ट खरी आहे. पण त्यांनी स्वतःच सांगितलं आहे काल, याबाबरदल मी दोन दिवसांनी धोरण बदललं. मग शपथ घायचं दोन दिवसांनी काय कारण होतं आणि तीही चोरून पहाटे घेण्याचं काय कारण,'' असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडेबोल सुनावले आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार यांच्याबाबत काही धक्कादायक खुलासे केले होते. यावरच आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Sharad Pawar on Devendra Fadnavis
Lok Sabha Election 2024: शिवसेना-भाजप लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले की, ''निवडणूक (2014 ची) झाल्याच्या नंतर त्यांना (भाजपला) बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका मी घेतली होती. नंतर द्यायची वेळ आली नाही. मात्र ते देण्या मागं आमचं काही करणं होतं.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''यानंतरच्या काळामध्ये त्यांनी (देवेंद्र फडणवीस यांनी) जे सांगितलं आहे, आमच्यात अनेक गोष्टींची चर्चा झाली. ही गोष्ट खरी आहे. पण त्यांनी स्वतःच सांगितलं आहे काल, याबाबरदल मी दोन दिवसांनी धोरण बदललं. मग शपथ घायचं दोन दिवसांनी काय कारण होतं आणि ती चोरून पहाटे घेण्याचं काय कारण?''

पवार पुढे म्हणाले की, पवार म्हणाले, ''आमचा पाठिंबा होता, तर दोन दिवस तरी ते सरकार राहिलं का तिथं, दोन दिवसात त्यांची सत्ता गेली. त्यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला. याचा स्पष्ट अर्थ आहे की, सत्तेसाठी आम्ही (भाजप) कुठी जाऊ शकतो. ही जी त्यांची बाजू आहे, ती एकदा समाजासमोर यावीत, त्या दृष्टीने काही गोष्टी केल्यात.''

Sharad Pawar on Devendra Fadnavis
Sharad Pawar Press Conference: गृहमंत्र्यांनी इतर वक्तव्ये करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

फडणवीस काय म्हणाले होते?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले होते की, ''2019 मध्ये भाजप-राष्ट्रवादीने सरकार स्थापन करण्याचं ठरलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादीतील काही लोक भाजपच्या संपर्कात होते. सरकार स्थापनेबाबत शरद पवार यांच्यासोबतही बैठक पार पडली होती. सरकार स्थापनेचे सर्व अधिकार मला आणि अजित पवार यांना दिले होते. त्यानुसार आम्ही तयारी केली. मात्र 3-4 दिवसातच शरद पवार मागे हटले आणि अजित पवारांकडेही पर्याय उरला नाही.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com