ATS Arrest Pakistani Spy 
देश विदेश

UP News: आणखी एका पाकिस्तानी हेराला वाराणसीतून अटक; भारतातील विविध ठिकाणांची माहिती पाकिस्तानला दिली

ATS Arrest Pakistani Spy: तुफैल फेसबुकच्या माध्यमातून एका पाकिस्तान महिलेच्याही संपर्कात होता. या महिलेचा पती पाकिस्तानच्या लष्करात कार्यरत आहे.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशच्या एटीएसने वाराणसीतून एका पाकिस्तानी हेरला अटक केलीय. एटीएसने अटक केलेला व्यक्ती हा भारत विरोधी संघटनांच्या संपर्कात होता. त्या संघटनांना त्याने भारतातील काही ठिकाणांची माहिती दिल्याची बाब चौकशीत उघड झालीय. भारतात बंदी असलेल्या तहरीक ए लब्बॅकचा म्होरक्या मौलाना शाद रिझवीचे व्हिडीओ व्हॉट्सअपवर शेअर करत होता.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, ६०० पेक्षा जास्त पाकिस्तानी मोबाईलच्या संपर्कात हा व्यक्ती होता. वाराणसी जिल्ह्यातील दोशीपुरा येथील रहिवाशी असलेल्या तुफैल मकसूद आलमला अटक करण्यात आलीय. तुफैल राष्ट्राच्या अखंडतेला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीची माहिती पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना देत होता असा आरोप करण्यात आलाय.

तुफैल पाकिस्तानातील अनेक व्यक्तीच्या संपर्कात होता. तसेच तो पाकिस्तानातील तहरीक ए लब्बॅक या संघटनेचा म्होरक्या मौलाना शाद रिझवी याचे भारतविरोधी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत होता. तुफैल हा बाबरी मशिदीचा बदला घेणे, भारतात शरीया कायदा लागू करणे, त्याचबरोबर गजवा ए हिंद करणे असे मेसेज होते, हे मेसेज तो वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करत होता.

तुफैलने भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती आणि फोटो पाकिस्तानातील व्यक्तींच्या नंबरवर पाठवली. भारतातील राजघाट, नमोघाट, ज्ञानव्यापी, रेल्वे स्टेशन, जामा मशीद, लाल किल्ला, निजामुद्दीन औलिया या ठिकाणांची माहिती त्याने पाकिस्तानात पाठवलीय. तुफैल ६०० पेक्षा अधिक पाकिस्तानी क्रमांकावर संपर्क करत होता, अशी माहिती एटीएसने आपल्या निवेदनात दिलीय.

तसेच , तुफैल फेसबुकच्या माध्यमातून एका पाकिस्तान महिलेच्याही संपर्कात होता. या महिलेचा पती पाकिस्तानच्या लष्करात कार्यरत असल्याची माहिती एटीएसने दिलीय. एटीएसने तुफैलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT