arrest Saam Tv
देश विदेश

UP: कार ओव्हरटेक करण्याच्या वादातून पत्रकाराची हत्या, दोन आरोपींना अटक

सहारनपूर येथील स्थानिक पत्रकार सुधीर सैनी यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. कारच्या झालेल्या भांडणात सुधीरला आपला जीव गमवावा लागला आहे.

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेश: सहारनपूरमध्ये स्थानिक पत्रकार सुधीर सैनी यांच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कारच्या बाजूच्या वादातून झालेल्या भांडणात सुधीर यांना आपला जीव गमवावा लागला. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. पत्रकाराचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

वृत्तानुसार पत्रकार सुधीर सैनी हे सहारनपूरच्या कोतवाली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चिलकाना रोडवरून मोटारसायकलवरून सहारनपूरला येत होते. तेथून सुधीर यांची ओव्हरटेकिंगवरून कारमधील तीन तरुणांशी बाचाबाची झाली. त्यानंतर कारमधील तरुणांनी सुधीर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

या जबर मारामारीत सुधीर यांना दुखापत झाली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. सुधीर सैनी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई सुरू केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या कारच्या क्रमांकावरून कार थांबवली आणि कार ताब्यात घेऊन पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे.

पोलिसांनी मृत सुधीरचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला आणि कार्यवाही सुरू केली आहे. एसएसपी आकाश तोमर यांनी सांगितले की, रोड रेजमध्ये पत्रकार सुधीर सैनी यांच्या हत्येतील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तसेच आरोपींवर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana ekyc : पती, वडीलांचे e-KYC बंधनकारक; लाडकींची संख्या आणखी घटणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Accident : अस्थी विसर्जन करून परतताना भरधाव कारची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Pillow Talk: पिलो टॉक म्हणजे काय? नवरा- बायकोसाठी का महत्त्वाचे आहे?

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

SCROLL FOR NEXT