Anil Awachat Passes Away: ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन
Anil Awachat Dies
Anil Awachat Diesअश्विनी जाधव केदारी
Published On

अश्विनी जाधव केदारी

पुणे - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट (Anil Awachat) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. डॉक्टर अनिल अवचट हे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते. अनिल अवचट यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिले आहे. त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी मोठं काम केलं. (Anil Avchat Passes Away)हे

मुक्तांगणचे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे थोड्या वेळापूर्वी राहत्या घरी निधन झाले. अवचट यांच्या पायावर चार दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती बिघडली त्यानंतर ते कोमामध्ये गेले आणि सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुक्ता आणि यशोदा या दोन मुली आहेत.

माहितीनुसार, दुपारी दोन वाजेपर्यंत, पत्रकारनगर येथे त्यांचे पार्थिव,अंत्यदर्शनाकरता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Anil Awachat Dies
मोठी बातमी! तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

साहित्यक्षेत्रात अनिल अवचट यांनी मोठे योगदान दिले आहे. 1969 मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची 22हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.

अनिल अवचट यांचा जन्म 1944 मध्ये झाला होता. ते सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक होते. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आणि नंतर 1968 मध्ये बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली होती.

डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला होता. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com