UP Elections: काँग्रेस नेत्यांची मुलंच घराणेशाहीला कंटाळली! - Saam Tv
देश विदेश

UP Elections: काँग्रेस नेत्यांची मुलंच घराणेशाहीला कंटाळली!

उत्तर प्रदेशात बऱ्याच वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी जोडली गेलेली अनेक घराणी आहेत. या कुटुंबांमधील नेते हे राज्यातील काँग्रेसचे भक्कम आधारस्तंभ मानले जातात. मात्र, याच घराण्यांमधील नवी पिढी मात्र विरोधी पक्षांना जाऊन मिळत असल्याने काँग्रेसची घराणेशाही हीच पिढी मोडून काढत असल्याचे चित्र आहे

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशात बऱ्याच वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी जोडली गेलेली अनेक घराणी आहेत. या कुटुंबांमधील नेते हे राज्यातील काँग्रेसचे भक्कम आधारस्तंभ मानले जातात. मात्र, याच घराण्यांमधील नवी पिढी मात्र विरोधी पक्षांना जाऊन मिळत असल्याने काँग्रेसची घराणेशाही हीच पिढी मोडून काढत असल्याचे चित्र आहे. (UP Elections Congress Leaders not happy with dynasty)

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) कमलापती त्रिपाठी (वाराणसी), नूर बानो (रामपूर), जितेंद्र प्रसाद (शाहजहानपूर) आणि कुंवर सी. पी. एन. सिंह (कुशीनगर) हे नेते काँग्रेसशी (Congress) एकनिष्ठ म्हणून प्रसिद्ध होते. या सर्व नेत्यांचा स्वत:चा असा मोठा समर्थक वर्ग असल्याने त्यांच्या लोकप्रियतेचा पक्षाला फायदा होतो.

या नेत्यांच्या पुढील पिढीने मात्र आपले भवितव्य शोधण्यासाठी इतर पक्षांचा आधार घेतल्याने घराणेशाही मोडीत निघण्याबरोबरच काँग्रेसचाही जनाधार कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस मोडकळीस आली असल्याने या कुटुंबांमधील ललितेश्‍वर त्रिपाठी, हैदर अली खान, जितीन प्रसाद आणि आर. पी. एन. सिंह यांनी आपले राजकीय करिअर करण्यासाठी पक्षांतर केले आहे.

जितीन प्रसाद आणि आर. पी. एन. सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हैदर अली खान हे अपना दलात गेले असून ललितेश्‍वर त्रिपाठी यांनी तृणमूल काँग्रेसचा आधार घेतला आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक तृणमूल काँग्रेस लढविणार नसून समाजवादी पक्षाला आमचा पाठिंबा असेल, असे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केल्याने ‘सप’चे अध्यक्ष अखिलेश यादव हे त्रिपाठी यांनाच उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.

फरक पडत नाही : काँग्रेस

काँग्रेसमधील बडे प्रस्थ असलेल्या नेत्यांच्या घरांमधील पुढील पिढीच विरोधकांना जाऊन मिळाल्याने थोडा फटका बसला तरी फार मोठा फरक पडणार नाही, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसमुळे या नेत्यांना ओळख होती, त्यांच्यामुळे पक्ष ओळखला जात नव्हता, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. आर.पी. एन. सिंह यांना पक्षाने अनेक महत्त्वाची पदे दिली, तरी त्यांनी पक्षांतर केले, याची खंत काँग्रेस प्रवक्ते पी. एल. पुनिया यांनी व्यक्त केली

ललितेश्‍वर यांचे आजोबा कमलापती त्रिपाठी हे राज्याचे मुख्यमंत्री होते. नूर बानो यांच्या कुटुंबातील हैदर अली खान यांना तर काँग्रेसने उमेदवारीही जाहीर केली होती. मात्र, ती नाकारून त्यांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अपना दलाचा रस्ता धरला. जितीन प्रसाद यांचे वडील जितेंद्र प्रसाद हे राजीव गांधी आणि पी. व्ही नरसिंह राव यांचे राजकीय सल्लागार होते.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Suraj Chavan : सूरज चव्हाणचं गुलीगत लग्न ठरलं? 'तिच्या'सोबतचा खास फोटो केला शेअर, म्हणाला "स्वप्न नाही..."

Local Power Block : मध्य रेल्वेवर ४ दिवसांचा विशेष मेगा ब्लॉक, नेरळ-कर्जत-खोपोली मार्गावर फटका, वाचा कोणकोणत्या ट्रेन रद्द

Fact Check: AI साडी ट्रेंड शरीराचे फोटो चोरतोय? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Breakfast Recipe : पालकाची भाजी खाऊन कंटाळलात? मग बनवा नाश्त्याचा 'हा' चटपटीत पदार्थ

SCROLL FOR NEXT