Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

madhya pradesh Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवल्याची घटना घडलीये. या घटनेने क्रीडा विश्वात खळबळ उडालीये.
madhya pradesh Shocking News
madhya pradesh Shocking Saam tv
Published On
Summary

आशियाई खेळात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने केली आत्महत्या

मध्य प्रदेशात बहिणीच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

रोहिणीच्या खोलीत कोणतीही चिठ्ठी न सापडल्याने आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही

रोहिणीने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी पदके जिंकली होती

आशियाई खेळात भारताचं प्रतिनिधित्व नेतृत्व करणाऱ्या ३५ वर्षीय रोहिणी कलम नावाच्या जुजुत्सू खेळाडूने आयुष्य संपवलं आहे. रोहिणीची लहान बहीण रोशनीच्या घरात लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मध्य प्रदेशच्या अर्जुननगरमध्ये संपूर्ण प्रकार घडला. महिला खेळाडूला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु रुग्णालयाने रोशनीला मृत घोषित केलं. खेळाडूच्या मृत्यूने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.

जुजुत्सू खेळात मास्टर असलेली रोहिणी टोकाचं पाऊल उलताना तिची आई आणि बहीण देवदर्शनाला गेले होते. तर वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. रोहिणीची लहान बहीण रोशनीने सांगितलं की, रोहिणी सध्या एका खासगी शाळेत मार्शल आर्ट कोच या पदावर कार्यरत होती. तिचे शाळेत काही वाद सुरु होते. ती शनिवारी घरी आली, त्यावेळी नाराज असल्याची दिसली. तिने सकाळी चहा आणि नाष्टा केला. त्यानंतर कोणाशी तरी फोनवर बोलणं केलं. त्यानंतर खोलीत जाऊन दरवाजा बंद केला होता.

madhya pradesh Shocking News
Shocking : धक्कादायक! खेळताना छतावरून कोसळला; लोखंडी सळई थेट पोटातून आरपार, ५ वर्षीय मुलाची प्रकृती नाजूक

रोहिणीचे वडील निवृत्त बँक कर्मचारी आहेत. रोहिणी ४ बहि‍णींपेक्षा मोठी होती. तिच्या खोलीत कोणतीही चिठ्ठी आढळली नाही. त्यामुळे तिच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. पोलिसांनी बँक नोट प्रेस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी रोहिणीच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध सुरु केला आहे.

madhya pradesh Shocking News
Maharashtra Politics : निवडणुकीआधीच महायुतीत बिनसलं; शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा भाजपला इशारा, नेमकं काय म्हणाले?

रोहिणीने आशियाई खेळात हाँगझोऊमध्ये झालेल्या १९ व्या आशियाई खेळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या व्यतिरिक्त तिने भारतासाठी अनेक पदके जिंकले होते. थायलँडमध्ये झालेल्या ओपन ग्रँड प्रिक्समध्ये तिने चांगली कामगिरी केली होती. तर बँकॉकमध्ये झालेल्या स्पर्धेत ४८ किलोग्रॅम वजनाच्या गटात कांस्यपदक' पटकावलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com