हा सॅटेलाईट फोटो नीट पाहा... हा भाग आहे लडाखमधील पेंगाँग तलावाच्या पूर्वेकडचा... 2020मध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला त्या गलवान खोऱ्यापासून अवघ्या 110 किलोमीटर अंतरावरचा.... या चीनच्या कागाळ्याचे फोटो इंडिया टुडे आणि अमेरिकास्थित व्हेंटॉर गुप्तचर संस्थेनं प्रसिद्ध केलेत... मात्र या फोटोत नेमकं काय आढळून आलंय?
चीनचं नियंत्रण कक्ष
लष्कराच्या बराकी
वाहनं ठेवण्याची जागा
लष्करी साहित्य ठेवण्यासाठी गोदाम
एवढंच नाही तर या फोटोतील काही इमारतीत क्षेपणास्त्रांचं प्रक्षेपण करण्यासाठीची जागा तयार करण्यात येत असल्याचाही अंदाज वर्तवला जातोय.. तर अमेरिकन गुप्तचर संस्था 'ऑल सोर्स अॅनालिसिस'च्या अंदाजानुसार, चीन येथे HQ 9 सारखी दीर्घपल्ल्याचा मारा करण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्र तैनात केले जाण्याची शक्यता आहे.. त्यामुळे अमेरिकेने चीनसोबत टॅरिफ वॉर छेडल्यानं भारतापुढे चीननं मैत्रीचा हात पुढं केलाय..मात्र चीनकडून भारत 113 अब्ज डॉलरची आयात करतो..
त्यामुळे अमेरिकेपाठोपाठ भारताची बाजारपेठ हातची जाऊ नये म्हणून चीन भारताला चुचकारतोय.. मात्र शांततेच्या गोष्टी करणाऱ्या याच चीन्यांनी पाकिस्तानला भारताविरोधात युद्धसाहित्य दिलं होतं.. आता अडचणीत असलेला चीन भारतासोबत शांततेच्या गोष्टी करत असला तरी सापाला दूध पाजलं तरी साप चावणं गुणधर्म सोडत नसतो, हेच भारतानं लक्षात ठेवायला हवं आणि चीनबाबत सावध भूमिका घ्यायला हवी...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.