

ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांचा सहकारी मलिक पुन्हा वादात
कारमधून तब्बल २८८ फटाके फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल
नागरिकांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल
फटाके रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांकडे फेकले गेल्याने अपघात टळला
मुंबईत काही दिवसांपूर्वी टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी गुन्हेगारी स्टाइल रील्स तयार केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या जवळचा सहकारी सज्जू मलिक याचा धिंगाणा समोर आला आहे. त्याने कारमधून तब्बल २८८ फटाके फोडले. कारमधून फटाके फोडताना रस्त्यांवर ठिणग्या उडाल्या. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सज्जू मलिक, आमदार सुनील राऊत यांचा जवळचा सहकारी चर्चेत आला आहे. सकाळी त्याने KGF चित्रपटातून प्रेरित व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. त्यानंतर आता त्याचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या नव्या व्हिडिओमध्ये सज्जू मलिक कारमध्ये बसलेला आहे. त्यावेळी चालक कार चालवत असताना 288 शॉटचे फटाके पेटवताना दिसतो. हे फटाके थेट रस्त्यावर धावणाऱ्या OLA आणि Uber वाहनांकडे फेकले जातात. ज्यामुळे CNG वाहनांना मोठा स्फोटाचा धोका निर्माण झाला होता. हा प्रकार जीवावर बेतू शकतो," असे नागरिकांचे म्हणणे असून भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल करून अंबरनाथ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे .
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी सज्जू मलिक याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे. या धोकादायक कृत्यामुळे रस्त्यावरील इतर वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होतो, या कारणामुळे पोलिसांकडूनही नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.