delhi Shocking news
delhi Shocking Saam tv

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

delhi Shocking : कॉलेजला जाताना अडवून तरुणीवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेने राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आहे.
Published on
Summary

दिल्लीत कॉलेजला जात असलेल्या तरुणीवर अॅसिड हल्ला

२० वर्षीय पीडित तरुणीचे हात गंभीर भाजले गेले

आरोपी जितेंद्र हा पीडित तरुणीच्या ओळखीचा

पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला

दिल्लीच्या लक्ष्मीबाई कॉलेजजवळ रविवारी दिल्ली विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कॉलेजपासून काही अंतरावर तरुणीवर अॅसिड हल्ला झाला. कॉलेजला जाताना तरुणीला अडवून तिच्यावर अॅसिड हल्ला केल्याचे समोर आलं आहे. या घटनेने राजधानीत खळबळ उडाली आहे.

पीडित तरुणीवर अॅसिड हल्ला होताना चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिचा हात भाजला. पोलिसांनी तरुणीच्या विधानावर कारवाई सुरु केली आहे. राजधानीत सकाळी १० वाजता घटना घडली. हल्ला झाल्यानंतर उपस्थित लोकांनी पीडित तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तरुणीच्या हात भाजल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तरुणीवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मुकुंदपूरची २० वर्षीय तरुणीवर अॅसिड हल्ला झाल्याची माहिती मिळाली. ही तरुणी दृतीय वर्षांची (नॉन-कॉलेज) विद्यार्थी आहे. तरुणी लक्ष्मीबाई कॉलेजच्या अशोक विहार येथे जात होती.

delhi Shocking news
Diwali Vastu Tips: दिवाळीच्या आधी फॉलो करा 'या' वास्तू टिप्स, घरात वाढेल नफा आणि संपत्ती

तरुणीवर तिच्या ओळखीच्या तरुणाने अॅसिड हल्ला केला. जितेंद्र असे मुख्य आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपी जितेंद्र हा मुकुंदपूरचा राहणार आहे. जितेंद्र हा ईशान आणि अरमानसोबत दुचाकीने आला होता. ईशानने अरमानला एक बॉटल दिली. त्यानंतर त्याने अॅसिड हल्ला केल्याचाही आरोप केला जात आहे.

delhi Shocking news
Diwali Lighting Vastu Tips: दिवाळीत लायटिंग लावताय? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा निवडा

हल्ला केल्यानंतर चेहरा झाकल्याने अॅसिडने तरुणीचे दोन्ही हात भाजले. आरोपी घटनास्थळावरून तातडीने फरार झाले. पीडित तरुणीच्या आरापोनुसार, जितेंद्रने पाठलाग केला. एका महिन्यापूर्वी तरुणी आणि त्याचे वाद झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पीडित तरुणीच्या विधानावरुन गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांचे अनेक पथक घटनास्थळावरील सीसीटीव्हींचा तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि आजूबाजूच्या लोकांची विचारपूस देखील सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com