सपा आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू
समाजवादी पक्षाने काँग्रेसला २६ जागा देण्याची तयारी
काँग्रेसकडून १३० विधानसभा मतदारसंघांची यादी सादर
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अनुषांगाने घडामोडींना वेग आलाय. समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला 26 जागांची ऑफर दिल्याची सुत्रांची माहिती आहे. काँग्रेसने सपासमोर १३० जागांची यादी सादर केलीय. यातील २६ जागा काँग्रेसला देण्यास समाजवादी पक्षाकडून मान्य करण्यात आलंय. उर्वरित जागांच्या बाबतीत समाजवादी पक्षाने काँग्रेसला आधी त्यांच्या उमेदवारांची नावे देण्यास सांगितले आहे; त्यानंतरच ते ठरवतील की आणखी किती जागा द्यायच्या. आणि त्या नेमक्या कोणत्या असतील
समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव आणि राजीव राय यांनी या २६ जागांची माहिती माध्यमांना दिली असून, त्यांची एक यादी देखील समोर आलीय. दरम्यान उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी राजेंद्र पाल गौतम आणि इम्रान मसूद यांनी २६ जागांच्या यादीबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचं म्हटलंय. या २६ पैकी एकाही जागेवर सध्या समाजवादी पक्षाचा (सपा) आमदार नाही. मात्र, या २६ जागांबाबत काँग्रेसमध्ये नाराजी असून, पक्षाने अद्याप त्यांना संमती दिलेली नसल्याचं म्हटलं जातंय.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचा भाग असताना काँग्रेसने प्रभावी कामगिरी करत ८० पैकी ४३ जागांवर विजय मिळवला होता. याच कामगिरीच्या आधारावर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने १३० जागांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, समाजवादी पक्ष जागावाटपासाठी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतील स्वतःच्या कामगिरीला आधार मानत आहे. इतकेच नव्हे, तर केवळ निवडणुकीत विजयाची खात्री असेल, तरच काँग्रेसला जागा देण्याबाबत समाजवादी पक्ष सकारात्मक असल्याचं म्हटलं जातंय.
म्हणजेच ज्या जागेवर विजय निश्चित असेल तीच जागा काँग्रेसला दिली जाईल. सध्या चर्चेत असलेल्या २६ जागांपैकी, २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या, तर चार जागांवर पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. यासह आणखी २० जागा आहेत, परंतु या यादीतून अमेठी आणि रायबरेली यांसारखे काँग्रेसचे बालेकिल्ले वगळण्यात आलेत. यामुळे सपा आणि काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
जागावाटपावर दोन्ही पक्षांकडून प्रतिक्रिया देण्यात आलीय. एएनआय-पीटीआय (ANI-PTI) ला दिलेल्या प्रतिक्रियात काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद म्हणाले की, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यातील जागावाटपाच्या चर्चेवर मोकळेपणाने भाष्य केले. जागांची 'मागणी करणे' आणि 'सहकार्य करणे' यात फरक असतो.
युतीमध्ये कशाचीही 'मागणी' करण्याची गरज नसते. उलट, सर्व काही परस्पर सहकार्यातून साध्य केले जाते. आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि आमच्या वाट्याला येणाऱ्या जागा निश्चित करू, असं मसूद म्हणालेत. दुसरीकडे समाजवाजी पक्षाचे खासदार राजीव राय म्हणाले की, त्यांना २६ जागा देण्यात आल्या आहेत. अजून काही जागा देण्यासाठी चर्चा केली जाईल.
२०२२ मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या जागा (२ जागा):
१. रामपूर खास
२. फरेन्दा
२०२२ मध्ये काँग्रेस दुसऱ्यास्थानी राहत ४ जागा जिंकल्या होत्या.
मथुरा
खेरागड
जगदीशपूर
किदवाई नगर
इतर प्रस्तावित जागा (२०)
1. बागपत
2. मोदीनगर
3. हापूर
4. जेवार
5. सायना
6. खुर्जा
7. खैर-इग्लास
8. मंट
9. आग्रा
10. उत्तर फतेहपूर
11. सिक्री
12. बिलग्राम-मल्लावन
13. गोविंद नगर
14. नानपरा
15. गोरखपूर शहर
16. खजनी
17. पडरौना
18. फाजीलनगर
19. पिंद्रा
20. वाराणसी कँट
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.