UP Cabinet Expansion Updates: Saamtv
देश विदेश

UP Cabinet Expansion: उत्तरप्रदेश मंत्रीमंडळ विस्तार; 'योगी सरकार'मध्ये नव्या ४ मंत्र्यांनी घेतली शपथ

UP Cabinet Expansion Updates: नव्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे आमदार दारा सिंह चौहान, आमदार सुनील शर्मा तसेच भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओपी राजभर आणि राष्ट्रीय लोकदलाचे आमदार अनिल कुमार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Gangappa Pujari

Uttar Pradesh Cabinet Expansion:

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारचा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी नव्या चार मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. नव्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे आमदार दारा सिंह चौहान, आमदार सुनील शर्मा तसेच भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओपी राजभर आणि राष्ट्रीय लोकदलाचे आमदार अनिल कुमार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती, नुकतेच ओपी राजभर यांनी तर मंत्रीपद न दिल्यास होळी साजरी करणार नाही, असा इशारा दिला होता त्यानंतर आता मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. या चार नवीन चेहऱ्यांसह योगी सरकारच्या आता मंत्रिमंडळात 57 मंत्री झाले आहेत. यामध्ये 25 चेहरे सर्वसाधारण गटातील, 21 ओबीसी, 10 एससी-एसटी आणि एक मुस्लिम नेते मंत्री आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

आज उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन! 'मोदींची गॅरंटी' वास्तवात आणून 'विकसित उत्तर प्रदेश'चा संकल्प साकार करण्यात तुम्ही सर्वजण महत्त्वाची भूमिका बजावाल, असा पूर्ण विश्वास आहे.तुम्हा सर्वांना तुमच्या उज्ज्वल कार्यकाळासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!, अशा शब्दात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नव्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी मंत्रिमंडळाचा हा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे. पूर्वांचलवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने दारा सिंह चौहान आणि ओपी राजभर यांना मंत्री केले असल्याचे मानले जात आहे. याआधीही राजभर हे योगी सरकारमध्ये मंत्री होते, मात्र योगी आदित्यनाथ यांच्याशी मतभेद झाल्याने राजभर यांना मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT