Shivraj Rakshe News: डबल 'महाराष्ट्र केसरी' पैलवान शिवराज राक्षेला शासकीय नोकरी; CM शिंदेंनी दिले नियुक्तीपत्र

Shivraj Rakshe Government Job Appointment: डबल महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान शिवराज राक्षेला शासकीय नोकरी देण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवराज राक्षेला क्रिडा अधिकारी म्हणून नियुक्तीपत्र दिले.
Shivraj Rakshe Got Government Job Appointment
Shivraj Rakshe Got Government Job AppointmentSaamtv

Maharashtra Kesari Shivraj Rakshe News:

डबल महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान शिवराज राक्षेला शासकीय नोकरी देण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवराज राक्षेला क्रिडा अधिकारी म्हणून नियुक्तीपत्र दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री शंभुराज देसाईही उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल शिवराज राक्षेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) आभार मानले.

मुळचा नांदेडचा असणारा मल्ल शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. जानेवारी २०२३ मध्ये पुण्यामध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली होती. या चुरशीच्या लढतीत शिवराज राक्षेने बाजी मारत महाराष्ट्र केसरीवर पहिल्यांदा नाव कोरले होते.

त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये  ६६ व्या महाराष्ट्र केसरीतही त्याने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र अंतिम लढतीत त्याला सिकंदर शेखकडून (Sikandar Sheikh) पराभव स्विकारावा लागला. परंतु धाराशिवमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुन्हा बाजी मारत शिवराजने महाराष्ट्र केसरीची गदा पुन्हा उंचावली. हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षेविरुद्ध ही लढत झाली. ज्यामध्ये शिवराजने बाजी मारली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shivraj Rakshe Got Government Job Appointment
मंगळवेढा : दुष्काळी भागातील शेतकरी आक्रमक; लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्धार

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर शिवराज राक्षेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. आतापर्यंतचा माझा प्रवास हा खडतर होता. त्यात मुख्यमंत्र्यांनी शासकिय अधिकारी म्हणून दिलेलं नियुक्ती पत्रकामुळे माझी आणि माझा कुटुंबियांची मेहनत आज सार्थ ठरल्याची भावना त्याने व्यक्त केली. (Latest Marathi News)

Shivraj Rakshe Got Government Job Appointment
Nana Patekar On Farmer : सरकारकडे काही मागू नका, सरकार कुठलं आणायचं हे ठरवा; शेतकरी प्रश्नावरून नाना पाटेकर संतप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com