Dharashiv News: शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी; हर्षवर्धन सदगीरवर मात करत मैदान मारलं!

Maharashtra Kesari Kusti Spardha Dharashiv: शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम लढत झाली.
Maharashtra Kesari Kusti Spardha Dharashiv
Maharashtra Kesari Kusti Spardha DharashivSaamtv

बालाजी सुरवसे, प्रतिनिधी

Dharashiv Breaking News:

हाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये पार पडला. नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये ६- ० ची आघाडी घेत शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली.

हाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव (Dharashiv) यांच्या संयुक्त विद्यमाने ६५ व्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेचा थरार धाराशिव शहरात रंगला. तुळजाभवानी क्रीडा संकुलात जंगी कुस्त्यांचा फड पाहायला मिळाला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ९५० मल्ल व ५५० पंच दाखल झाले होते.

या स्पर्धेचा अंतिम सामना आज पार पडला. माती विभातून हिंगोलीच्या गणेश जगतापचा पराभव करत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने (Harshawardhan Sadgir) अंतिम फेरीत धडक मारली होती. तर गादी गटातून नांदेडच्या शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) महाराष्ट्र केसरीची गदा उंचावण्यासाठी दंड थोपटले होते. या अटीतटीच्या लढतीत पहिल्यापासून आक्रमक झालेल्या बाजी मारली.

Maharashtra Kesari Kusti Spardha Dharashiv
Maharashtra NCP Crisis: अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करा.. निवडणूक आयोगासमोर मोठी मागणी; आजच्या सुनावणीत काय घडलं?

स्पर्धेदरम्यान, शिवराज राक्षेने पहिल्यापासून आपल्या ताकदीच्या जोरावर हर्षवर्धनवर मात करण्यात यश मिळवले. स्पर्धेतील विजेत्या मल्लासाठी स्कॉर्पिओ गाडी व मानाची गदा व अन्य विजेत्या मल्लांसाठी दोन कोटींची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेत फूट पडल्याने गेल्या दोन वर्षांपासून राज्यात दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतल्या जात आहेत. दोन्ही गट महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवतात. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Kesari Kusti Spardha Dharashiv
Jalgaon News : देवीच्या दर्शनापूर्वी हातपाय धुवायला गेले; धरणात बुडून वृद्धाचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com