Nana Patekar On Farmer : सरकारकडे काही मागू नका, सरकार कुठलं आणायचं हे ठरवा; शेतकरी प्रश्नावरून नाना पाटेकर संतप्त

Nana Patekar On Farmer Video : राजकारणात जाण्याच्या चर्चांवर त्यांनी म्हटलं की, माझ्या पोटात जे तेचं ओठांवर येतं, त्यामुळे मला राजकारणात जाता येत नाही.
Nana Patekar
Nana Patekar Saam TV
Published On

Nashik News :

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारकडे काही मागू नका. सरकार कोणते करायचे हे ठरवा, असं अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात नाना पाटेकर बोलत होते. चांगले दिवस येतील याची वाट पाहू नका, जिद्दीनं चांगले दिवस आणावे लागतील, असा सल्ला देखील त्यांना शेतकऱ्यांना दिला. (Latest Marathi News)

Nana Patekar
Rahul Narvekar News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ई-मेल हॅक, थेट राज्यपालांना मेसेज; कोणाची केली तक्रार?

म्हणून राजकारणात जात नाही

राजकारणात जाण्याच्या चर्चांवर त्यांनी म्हटलं की, माझ्या पोटात जे तेचं ओठांवर येतं, त्यामुळे मला राजकारणात जाता येत नाही. दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून, महिन्याभरात सगळे पक्ष संपतील, मग कशाला जायचं? असंही त्यांनी म्हटलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्याचं अख्खं आयुष्य आभाळाखाली असतं. त्यांच्या पिकाला तिजोरी नसते. पाखरं खातात, वानरं येऊन खातात. उरलेलं आम्ही खातो. मात्र त्याचा जो रास्त भाव आहे, तो आम्हाला द्या. त्याच्या पलिकडे आम्ही काय मागतोय, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं. सोन्याचा भाव कित्येक पटीत वाढला. मात्र गव्हाचा, तांदळाचा भाव काय पटीत वाढला तुम्हाला माहिती आहे.

सरकारकडे आता काही मागू नका, कुठलं सरकार करायचं हे ठरवा. मला राजकारणात जाता येत नाही. कारण माझ्या पोटात जे आहेत तेच ओठात आहे. मला लगेच काढतील पक्षातून.

किती पैसा साठवणार? मृत्यू अटळ आहे मग कशासाठी येवढा संचय करायचा. कधी कळणार हे. पुढच्या पीढीसमोर काय आदर्श ठेवणार आहोत. रोज अन्न देणाऱ्यांची किंमत नसेल तर आम्ही तरी किंमत का करावी? असा सवाल नाना पाटेकर यांनी म्हटलं.

Nana Patekar
Gujarat Politics : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; गुजरातच्या बड्या नेत्यांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

शेतकरी तुमची कधीच अडवणूक करणार नाही. जनावरांची भाषा शेतकरी जाणतो, त्यांची भाषा तु्म्हाला कळत नाही का? हे कधी संपणार. कसले स्वतंत्र झालो आम्ही. एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीत आलो. त्याला वाचा फोडण्यासाठी लिहा, ते तुमच्या लिखाणात यायला हवं, असं आवाहन नाना पाटेकर यांनी शेतकरी साहित्य संमेलनातून केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com