Cabinet Minister Sanjay Nishads Car Saam Tv News
देश विदेश

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

Cabinet Minister Sanjay Nishads Car: यूपी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान मंत्री संजय निषाद यांची फॉर्च्युनर नो पार्किंगमध्ये उभी होती. वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गाडी क्रेनने उचलून नेली.

Bhagyashree Kamble

  • यूपी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान मंत्री संजय निषाद यांची फॉर्च्युनर नो पार्किंगमध्ये उभी होती.

  • वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गाडी क्रेनने उचलून नेली.

  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • नेटकऱ्यांनी पोलिसांच्या या कृतीचे कौतुक केले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेचं पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्टदरम्यान पार पडलं. या अधिवेशनादरम्यान एक वेगळीच घटना घडली. राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय निषाद यांची गाडी वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने उचलून नेली. चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

गाडी नो पार्किंगमध्ये पार्क केली होती

उत्तर प्रदेश विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, कॅबिनेट मंत्री संजय निषाद यांची पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर गाडी उचलून नेण्यात आली. ही संपूर्ण घटना गुरूवारी घडली. निषाद यांच्या चालकाने विधानसभेच्या आवारात गाडी नो पार्किंग झोनमध्ये लावली होती. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी विलंब न करता तात्काळ कारवाई केली. कार तेथून हटवण्यासाठी क्रेन बोलावली.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, की पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनरला क्रेनने उचलले जात आहे. पोलिसांच्या या कृतीचे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

संजय निषाद हे निषाद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये मत्स्यव्यवसाय मंत्री आहेत. त्यांनी २२ मार्च २०२२ रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat-Anushka: विराट आणि अनुष्काचे अनसीन रोमँटिक फोटो पाहिलेत का?

Shocking: भाजप महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट, ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं

Maharashtra Nagar Parishad Live : अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्रावर अद्यापही लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील पांगरा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

Dr Ambedkar Favourite Cafe: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईतला आवडता कॅफे कोणता होता?

SCROLL FOR NEXT