'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Praful Patel Tells NCP Workers: भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना थेट संदेश दिला. "युतीचं डोक्यातून काढून टाका" असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. सक्षम उमेदवार असेल तर प्रत्येक प्रभागात उमेदवार लढवायचा, असं निर्देश दिले.
Prafull Patel
Prafull PatelSaam Tv News
Published On
Summary
  • भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना थेट संदेश दिला.

  • "युतीचं डोक्यातून काढून टाका" असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

  • सक्षम उमेदवार असेल तर प्रत्येक प्रभागात उमेदवार लढवायचा, असं निर्देश दिले.

  • या वक्तव्यामुळे महायुतीत नाराजी व स्वतंत्र लढतीच्या शक्यता दिसत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही ठिकाणी फोडाफोडीचे राजकारण दिसून येत आहे, तर काही कार्यकर्ते स्वतःहून पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत आहेत. अशातच भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना थेट सूचना दिल्या आहेत. 'युतीचं डोक्यातून काढून टाका' असं ते म्हणाले. त्यामुळे महायुतीत सारं काही अलबेल आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल भंडाऱ्यात दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिथं युती होईल तिथेच युती करायच्या, असं आमचं धोरण आहे. त्यामुळे युतीचं डोक्यातून काढून टाका', अशा थेट सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

Prafull Patel
मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ३० गोविंदा गंभीर जखमी, एकाचा मृत्यू

'प्रभागात आपल्याकडे सक्षम उमेदवार असेल, दुसऱ्याकडे तसेच तिसऱ्याकडेही उमेदवार असू शकतो. अशा स्थितीत आपल्या कार्यकर्त्याला संधी नं देणं त्याचं मन दुखवणं, हे योग्य वाटतं नाही. त्यामुळे जिथे सोयीचं वाटत असेल आपण तिथे बघू', असं पटेल म्हणाले. 'सार्वत्रिक निवडणूक आहे, मतांचा विचार असतो. जिथे आपली ताकद आहे, तिथं आपण विचार केलाचं पाहिजे', असंही पटेल यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Prafull Patel
भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

'असं होणार नाही की, मागच्या निवडणुकीत दुसरा उमेदवार निवडुन आला म्हणून ती जागा सोडायची. आपली ताकद असेल तर, आपण लढायचं. प्रत्येक प्रभागात आपला उमेदवार लढेल. हा विचार करून प्रत्येकानं कामाला लागले पाहिजे', असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Prafull Patel
सून बाथरूममध्ये आंघोळ करत होती, सासऱ्यानं मागून धरलं अन् बेडवर ढकललं; सासऱ्याचा खरा चेहरा समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com